प्रतिनिधी, पुणे : पुण्यासह राज्यातील गृहनिर्माण सोसायट्या व अपार्टमेंटना लवकरच आपल्या इमारतीतील अग्निरोधक यंत्रणा सुस्थितीत असल्याबाबतचा अहवाल ऑनलाइन दाखल करता येणार आहे.परवानाधारक अग्निसुरक्षा सेवा एजन्सींकडून या अग्निरोधक यंत्रणेची तपासणी करून वर्षातून दोन वेळा हा अहवाल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अग्निशमन विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे. त्याची प्रक्रिया ऑनलाइन झाल्यास या सक्तीच्या नियमाचे पालन करणे सोसायट्यांना सुलभ […]