प्रतिनिधी, पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ज्युनिअर कॉलेजांमध्ये राबविण्यात येणाऱ्या अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत आतपर्यंत ८० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पैकी साधारण २५ हजार विद्यार्थ्यांनी कॉलेजांचे पर्याय भरले आहेत. यंदा दहावीचा निकाल वाढला असला, तरी त्या प्रमाणात विद्यार्थ्यांची नोंदणी झाली नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने पुणे-पिंपरी चिंचवडसह मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावतीमध्ये […]