Swargate Crime Update : पोलिसांची 8 पथकं आरोपीच्या मागावर; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पत्रकार परिषदेत माहिती

स्वारगेट अत्याचार घटनेची माहिती लवकर मिळाली असती तर आरोपीला लवकर पकडणे झाले असते. सध्या आरोपीचा शोध सुरू आहे, त्याला लवकरच पकडण्यात येईल, असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. घटना लपवून ठेवण्याच प्रकार झालेला नाही. मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे. जी या केसमध्ये गरजीची होती, असंही योगेश कदम यांनी यावेळी सांगितलं.

पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर या घटनेबद्दल राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आज गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील पुण्यामध्ये दाखल होत स्वारगेट बसस्थानकाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी याबद्दल पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, पोलिसांकडून कोणतं दुर्लक्ष झालं किंवा पोलीस गस्त घालत नव्हते म्हणून ही घटना घडली अशातील भाग नाही. पोलिसांमार्फत त्या दिवशी रात्री 12 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत गस्त घालण्यात येत होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील रात्री दीड वाजता सीपी स्वतः गस्त घातल असल्याचे दिसत आहेत. ते बसस्थानकाच्या आवारात फेरी मारुन गेले असून रात्री तीन वाजता देखील पीआय तिथून गेले असल्याचं योगेश कदम यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना कदम म्हणाले की, या आरोपीवर चोरीच्या स्वरुपातील गुन्हे दाखल आहे. पोलिसांची आठ पथकं आरोपीच्या मागावर आहे. हा आरोपी लवकरच पकडला जाईल. बसच्या आजूबाजूला 10 ते 15 लोकं होते. मात्र आरडाओरड न झाल्यामुळे आजूबाजूच्या लोकांना याबाबत कळून आले नाही. एस टी महामंडळाकडून खाजगी सुरक्षा घेण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आढावा बैठक घेत यासंबंधित ते निर्णय घेतील, असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)