Supriya Sule News : सुप्रिया सुळेंनी केली स्वारगेटच्या बसस्थानकाची पाहाणी, म्हणाल्या..

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून आज पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकाची पाहाणी करण्यात आलेली आहे. याठिकाणी 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर ही पाहाणी सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सरकार लाडक्या बहिणींबद्दल एवढं बोलतं. मग या प्रकरणात सत्ताधारी मंत्र्यांनी जे वक्तव्य केले ते योग्य आहेत का? पीडित मुलगी घाबरलेली होती. ती देखील कोणाच्यातरी घरातली मुलगी आहे, तिच्याबद्दल असे वक्तव्य करणे कोणालाही शोभत नाही. मुख्यमंत्र्यांनी जो चाप ओएसडी आणि त्यांच्या पीएनबद्दल लावला आहे, तोच त्यांच्या मंत्र्यांबद्दल देखील लावावा हीच आमची अपेक्षा आहे. राज्यात महिलांवर होणारे अत्याचार वाढले आहेत. गुन्हेगारी वाढली आहे. रक्षा खडसे यांच्या मुलीवर सुरक्षा रक्षक सोबत असताना देखील जो अत्याचार झाला, राज्यात सातत्याने अशा घटना होत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)