Supriya Sule: राज्यातील स्थिती अत्यंत भयानक, गुन्हेगारीचे केंद्र नागपूर ऐवजी पुणे बनत चालले- सुप्रिया सुळेंचा आरोप

बारामती(दीपक पडकर): अगोदर गुन्ह्यांचे केंद्र महाराष्ट्रात नागपूर होते दुर्दैवाने आता ते पुणे बनत चालले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत भयानक आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी आज बारामती पत्रकार परिषदेत केला.

पुण्यातील महिला पोलिसावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, आज राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पुण्यात सातत्याने क्राईम वाढत आहे. मी आरोप करत नाही, हा डेटा केंद्र सरकारचा आहे . हा डेटा महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे, असे सांगतोय. याचे अगोदर नागपूर केंद्र असायचे आता पुणे आहे.

रवींद्र वायकर यांना नुकतीच त्यांच्यावरील आरोपा संदर्भात क्लीनचीट मिळाली आहे. या संदर्भात विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, भारतीय जनता पक्षाचे नेते अगोदर विरोधातील लोकांवर आरोप करतात, त्यानंतर त्यांचा भाजपा किंवा मित्र पक्षात प्रवेश घेतात आणि नंतर मंत्री आमदार किंवा खासदार पदावर बसतात. भारतीय जनता पार्टी ही आता भ्रष्टाचारांची टोळी बनली आहे.
Virat Kohli And Anushka Sharma: टी-२० मधील निवृत्तीनंतर विराट कोहली-अनुष्का शर्मा कायमसाठी भारतातून शिफ्ट होणार? यामुळे सुरू झाली चर्चा

रवींद्र वायकर यांच्यावरील आरोप आणि ते भ्रष्टाचारी आहेत की, नाही याचे उत्तर फक्त देवेंद्र फडणवीस देऊ शकतात. जे महाराष्ट्रातले आमदार, खासदार जे आज तुमच्याबरोबर आहेत, ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप केले ते सिद्ध झाले नाहीत. यातील खरं काय खोटं काय याची एक पारदर्शक श्वेतपत्रिका या राज्याने मागितली पाहिजे की, नक्की भ्रष्टाचार कोण या राज्यात करत आहे. हे फक्त महाराष्ट्र पुरतं मर्यादित नाही, संपूर्ण देशात केंद्रीय संस्थाचा तपास मागे लावायचा, नंतर वॉशिंग करायचं आणि पक्षात घ्यायचं.
Rohit Sharma Felicitation Event: बरं झालं सूर्याच्या हातात बॉल बसला, नाही तर पुढे त्याला मी बसवला असता; विधानभवनात रोहित शर्माची तुफान बॅटिंग, पाहा संपूर्ण भाषण

सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना जिल्हा नियोजन मंडळाच्या निधी बाबत पत्र दिले आहे. या संदर्भात विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी पत्र लिहिलं आहे. याचे कारण की, अमोल कोल्हे आणि मला निधी मिळत नाही. जनतेच्या कामासाठी आम्ही निधी मागत आहोत. आम्ही निवडून आलेल्या लोकांचे प्रतिनिधी आहोत. पाच टक्क्यांचा तर आमचा अधिकार आहे ना ? आम्ही आमच्या कामसाठी निधी मागत नाही. लोकांचा विकास हवा आहे. आम्हाला क्रेडीट नको. आमचं काम आहे लोकांच्या सेवेसाठी आम्ही निधी मागत आहोत.

महाराष्ट्रातले सरकार बदलणार…

महाराष्ट्रातील सरकार ऑक्टोबरमध्ये बदलणार आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, दुधाला भाव नाही. सातत्याने बदलणारी सरकारची पॉलिसी आहे. त्यामुळे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचारी असं हे सरकार आहे. कालच एक जण मला म्हणाला की, ही सरकार एमबीबीएस आहे. पण मला डॉक्टरांना दुखवायचं नाही. त्यांची बदनामी मला करायची नाही, असे सुळे म्हणाल्या.