Supriya Sule: जनतेनं निवडणुकीत दाखवून दिलंय, संविधानानेच देश चालणार; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

पुणे : ‘लोकसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिलंय की, संविधानानेच देश चालणार आहे. पन्नास खोके इज नॉट ओके हे देखील जनतेनेच सांगितलंय,’ अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. बारामतीच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे या पुणे दौऱ्यावर आल्या असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

लोकसभेच्या रणधुमाळीनंतर देशात राष्टीय लोकशाही आघाडीचे सरकार देशाच्या सत्तेत विराजमान झाले आहे. परंतु केंद्रातील सर्वांत मोठ्या पक्षाला महाराष्ट्राने मात्र केवळ ९ जागांवर आणून ठेवल्याने हे भाजपाचे मोठे अपयश असल्याचे सांगितले जातेय. याउलट महाराष्ट्रातील जनतेने प्रादेशिक पक्षाचे १८ खासदार संसदेत पाठवले आहेत. यावरुन आता सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘पन्नास खोके इज नॉट ओके’ अशी खोचक टीका सुळे यांनी केली आहे.
अशोक चव्हाणांनी भाजपात येऊन स्वतःचं नुकसान केलं, राज्यसभेची लायकी नाही, भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्याचा प्रहार
संविधानानेच देश चालणार आहे हे देशाच्या जनतेने दाखवून दिलं आहे. लोकसभेतील आमचं यश मोठं असलं तरी निश्तितच पक्ष प्रतिनिधींची जबाबदारी आता वाढली आहे. पुण्यातील उद्योग बाहेर जात आहेत. ही चिंतेची बाब असून या मुद्द्यावर आवाज उठवणं गरजेचं आहे, असे नमूद केले आहे. तर ‘मंत्रीपद मिळालंय पुण्याला. त्याचा मला आनंदच आहे. पण त्याचा फायदा कॅान्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा ही अपेक्षा’ असा टोला देखील सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
NCP Foundation Day : राष्ट्रवादीचा वर्धापन दिन ठरणार शरद पवारांच्या नव्या राजकीय पर्वाची सुरुवात? नगरमधून फुंकणार विधानसभेची ‘तुतारी’
दरम्यान पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी ‘अजित पवार गटाकडे जो पक्ष आणि चिन्ह आहे, त्याखाली नोटीस आहे. तो पक्ष त्यांचा अद्याप पुर्णपणे झालेला नाही. कोर्टात केस सुरु आहे.’ असे सूचित करत ‘आमचं आघाडी सरकार असताना आम्ही मान सम्मान टॅलेंटवर मंत्रीपदं दिली होती,’ अशा शब्दांत अजित पवारांना फटकारले आहे.