Sunil Tingre: एककीडे अटकेची टांगती तलवार, दुसरीकडे मतदारसंघात होणार प्रहार? टिंगरेंच्या अडचणीत वाढ

पुणे: अवघ्या देशाच लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल लागला आहे. पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी होणार आहेत. ते ९ जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेतील. तर, दुसरीकडे आता सर्वपक्षीय नेते पदाधिकारी विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. मात्र, ही तयारी करत असताना मोठा पेच माहयुतीमध्ये रंगणार आहे.

पुण्यातल्या वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून जगदीश मुळीक विधानसभाच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीला मोठं मन राखत एक पाऊल माघे घेऊन मुरलीधर मोहोळ यांचा जोर दार प्रचार केला, म्हणून आता मुळीक यांना विधानसभेचे वेध लागले आहेत. तशी त्यांनी कामाला सुरुवात देखील केली आहे. पक्ष संघटना गठीत करणे, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची भेट घेणे, तसचे नवीन विधानसभा ऑफिसची तयारी ही केली आहे. परंतु आता विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा विचार होणार का, याकडे वडगावशेरी मधील मतदारांच लागलं आहे.

पुणे लोकसभेच मतदान पार पडल्यानंतर १८ मे रोजी पोर्शे अपघात प्रकरण घडलं. बिल्डर पुत्राने आपल्या माहगड्या पोर्शे गाडीने दोघांचा जीव घेतला आणि त्याला १५ तासातच जामीन पण मिळाला. हे प्रकरण पुण्यातल्या गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत पोहोचलं. सर्वसामान्य नागरिक अगरवाल कुटुंबीयांबद्दल रोष आणि संताप व्यक्त करत होते, असं असताना या प्रकरणात आमदार सुनील टिंगरेच नाव समोर आलं.

आमदार सुनील टिंगरे यांनी प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला अशी चर्चा होती. परंतु या बद्दल स्पष्टीकरण देत आपण फक्त आढावा आणि माहिती घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो असं स्वतः सुनील टिंगरे यांनी माध्यमापुढे येऊन सांगितलं. परंतु अजूनही विषय पूर्णत्व संपलेला नाही.

कल्याणी नगर अपघात प्रकरणात अटक केलेले डॉक्टर आणि दोन आरोपी यांचा सुनील टिंगरेंसोबत संपर्क होता, असे पोलिसांच्या माहितीतून समोर येत आहे. परंतु टिंगरे यांची प्रकरणात इनवोलमेंट थेट समोर येऊ शकली नाही. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच अजित पवार पक्षचा झालेला पराभवा मुळे विधानसभेला दादांच्या पारड्यात किती जाग पडतील यांची खात्री नाही. या मधील वडगावशेरी विधानसभेची जागा मिळेल का, यांची शशंकता नाही.

तर मुंबईतल्या चिंतन सभेला पण सुनील टिंगरे गैरहजर होते. वडगावशेरीचे विद्यमान आमदार असल्यामुळे सुनील टिंगरे यांना लोकसभा निवडणुकीची जबादारी मिळाली होती. पण वडगावशेरी मधून रवींद्र धंगेकर यांनी १४,९८५ मतांच लीड घेतलं होतं, तर मुरलीधर मोहोळ यांना १०४५७३ एवढे मतदानात झालं होतं आणि धंगेकर यांना ११९७३८ एवढं मतदान झालं होतं. या कारणामुळे देखील सुनील टिंगरे यांच्यावर पक्षाची नाराजी आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे.