Summer Weightloss Tips: उन्हाळ्यात लठ्ठपणा होईल कमी, आहारात या पदार्थांचे आहारात करा समावेश; त्वचा राहिल हायड्रेटेड

आजकाल अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. चुकिच्या खाण्या पिण्यामुळे आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. लठ्ठपणाच्या समस्येमुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि वजन वाढीमुळे तुमच्या शरीराला त्रास होऊ शकतो. वाढलेल्या वजनामुळे तुम्हाला आळसपणा देखील वाटू शकतो. परंतु आजकर लोकं त्यांच्या आरोग्याला घेऊन भरपूर त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यात वजन कमी करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारामध्ये प्रोटिन, फायबर आणि हेल्दी फॅट्सचा सामावेश करा. त्यासोबतच दररोज नियमित जीम किंवा व्यायाम करणे फायदेशीर ठरेल.

उन्हाळ्यामध्ये वातावरणातील तापमान वाढते. वाढलेल्या तापमानामुळे जास्त प्रमाणात पाण्याचा किंवा ज्यूसचं सेवन केले जाते. जास्त प्रमाणात पाणी किंवा ज्यूस प्यायल्यामुळे तुमचं पोट दीर्घकाळ भरलेलं राहाते आणि तुम्हाला सतत भूक लागत नाही. उन्हाळ्यात तुमच्या जीवनशैलीमध्ये विशेष बदल करण्याची गरज असते. विशेषत: तुम्ही जर वन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या आहाराकडे आणि आरोग्याला त्रास होऊ नये अशा गोष्टी कराव्या. उन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर काय करावे? चला जाणून घेऊया.

उन्हाळ्यात तापमान गरम असते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही योग्य व्यायाम केलात तर जास्त प्रभावी मानला जाते. उन्हाळ्यात तुमच्या शरीरारतील अधिक कॅलरिज बर्न होतात ज्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. त्यासोबतच जास्त पाणी किंवा हेल्दी ज्यूल प्यायाल्यामुळे देखील तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो. तज्ञांच्या मते, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर व्यायामासोबतच काही आरोग्यदायी गोष्टींचा आहारात समावेश करू शकतो. कमी कॅलरीजमुळे, ते चरबी जाळण्याच्या प्रक्रियेत खूप फायदेशीर ठरेल. उन्हाळ्यात तुमच्या आहारात टरबूजाचा समावेश करा. या फळात 90% पाणी असते. त्यात खूप कमी कॅलरीज असतात. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासोबतच पोटही भरलेले वाटते. याशिवाय, तुम्ही सॅलडमध्ये काकडीचा समावेश करू शकता. संत्री, लिंबू आणि पेरू यांसारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे चयापचय वाढतो. तसेच चरबी कमी करण्यास मदत होते.

दह्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम सारख्या गोष्टी मुबलक प्रमाणात आढळतात. हे पचन, हाडे, दात आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. वजन वाढण्यापासून रोखण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे निरोगी चयापचय राखण्यास मदत करतात. ग्रीन टी सारख्या हर्बल पेयांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे चयापचय वाढवतात. जर तुम्हाला चरबी जाळायची असेल तर ते दिवसातून 2-3 वेळा प्या, याशिवाय पुदिना, आले आणि लिंबू असलेली चहा देखील चरबी जाळण्यास मदत करते. तज्ञ म्हणतात की चरबी कमी करण्यासाठी दिवसातून 3 वेळा खाणे महत्वाचे आहे. याशिवाय, तुम्ही निरोगी स्नॅक्स निवडावेत. यामुळे चयापचय जलद राहतो आणि तुम्ही जास्त खाऊ शकत नाही. उन्हाळ्यात जास्त तळलेले आणि जड अन्न खाणे टाळा कारण ते शरीरात अतिरिक्त कॅलरीज साठवतात.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)