Summer Skincare Tips : उन्हाळ्यात निरोगी त्वचेसाठी ‘या’ सोप्या ट्रिक्स करा फॉलो….

बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या जीवनशैलीमध्ये काही विशेष बदल करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात वातावरणामध्ये आद्रता भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे तुम्हाला सतत घाम येतो. त्यासोबतच तुम्हाला सूर्यप्रकाशामुळे तुमचं शरीर आणि चेहरा टॅन होते. परंतु अनेकवेळा वातावरणातील बदलामुळे तुमची त्वचा कोरडी होते. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्याला त्वचेची काळजी घेणे कठिण होते. त्वचेची काळजी नाही घेतल्यामुळे चेहरा खराब होतो. चेहऱ्याची योग्य काळजी नाही घेतल्यामुळे तुम्हाला अनेक समस्या उद्भवते. त्वचेची योग्य काळजी नाही घेतल्यामुळे तुम्हाला पिंपल्स आणि मुरूम सारख्या समस्या होतात.

चेहऱ्याची योग्य काळजी नाही घेतल्यामुळे तुमचं सैंदर्य खराब होऊ लागते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही पार्लरमध्ये अनेक प्रयोग केले जातात. पार्लरमध्ये हजारो रूपये खर्च केले जातात. उन्हाळ्यातील सूर्यप्रकाशामुळे अनेकदा चेहऱ्याची जळजळ होते. पिंपल्स आणि मुरूमचे डाग अनेकवेळा डाग चेहऱ्यावर राहून जातात आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. चेहरा अधिक चमक बनवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करणे फायदेशीर असते. चला जाणून घेऊया काय घरगुती उपाय केले पाहिजेल.

क्लेंझर – सूर्यप्रकाशातून घरामध्ये आल्यावर तुम्ही कोणताही सौम्य क्लेंझरचा वापर करून चेहरा स्वच्छ करा. सौम्य क्लेंझरचा चेहऱ्यावर वापर केल्यामुळे चेहऱ्यावरील हायड्रेशन दूर होण्यास मदत होते. सौम्य क्लेंझर तुमच्या चेहऱ्यावरील अशुद्धता काढून टाकते आणि त्यामधील ग्लिसरीन आणि कोरफडीने समृद्ध सल्फेट-मुक्त क्लेंझर तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेते. तुमच्या त्वचेला कोमट पाण्याने धुवा यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील धुळ आणि प्रदुशन निघून जाते. क्लेंझरमध्ये हायलुरोनिक अॅसिड, सिरॅमाइड्स आणि नियासिनमाइड असतात ज्यामुळे तुमची त्वचा मॉइश्चरायझ होते. हायलुरोनिक अॅसिडमुळे तुमची त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते.

व्हिटॅमिन सी सीरम – आठवड्यातून एक किंवा दोनदा ग्लायकोलिक किंवा लॅक्टिक अॅसिड सारख्या सौम्य रासायनिक एक्सफोलिएंटने एक्सफोलिएट करा. त्वचेला एक्सफोलिएट केल्यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास आणि त्वचेला जळजळ न होता मऊ करण्यास मदत करते. चमकदार त्वचेसाठी व्हिटॅमिन सी सीरम वापरा.

सनस्क्रीन – दररोज त्वचेला सनस्क्रीन लावल्यामुळे त्वचा निरोगी होण्यास मदत होते. तुमच्या चेहऱ्यावर झिंक ऑक्साईड किंवा टायटॅनियम डायऑक्साइड असलेले एसपीएफ ३० सनस्क्रीन लावा. जर तुम्ही घराच्या बाहेर जाताना प्रत्येक दोन तासानी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावा.

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, बायो री-मॉडेलिंग सारख्या नॉन-इनवेसिव्ह उपचारांचा देखील वापर केला जाऊ शकतो. प्रोफिलो ही एक बायो री-मॉडेलिंग प्रक्रिया ज्यामुळे त्वचा हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते. यामुळे तुमच्या त्वचेला अधिक कोलेजन आणि इलास्टिन तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा मऊ होते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यानी चेहरा धुतल्यामुळे त्यावरील सर्व धूळ निघून जाण्यास मदत होते आणि पिंपल्स, मुरूम सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)