वाघनखासाठी किती रुपये खर्च झाला यांची माहिती मुनगंटीवारांनी सभागृहासमोर ठेवली, जाणे – येणे आणि करार खर्च एकूण मिळुन 14 लाख आठ हजार रुपयांचा खर्च झाला असे मुनगंटीवार म्हणाले इतकेच नव्हे तर वाघनख ठेवण्यासाठी ७ कोटी रुपयांचा खर्च सरकार करणार आहे, असा सुद्धा विरोधकांनी आरोप केला होता, त्यावर मुनगंटीवार म्हणाले वाघनख ठेवण्यासाठी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज यांची शस्त्र प्रदर्शन करतोय चार ठिकाणी त्या जागेची डागडुजी आणि संग्रहालयाचे नुतनीकरण यासाठी ७ कोटींचा खर्च केला गेला आहे असे विरोधकांचा आरोप खोटा आहे अशी मुनगंटीवार यांनी माहिती दिली.
वाघनखांसाठी कोणतेही भाडे दिले जाणार नाही आणि कोणतेही करोडो रुपये खर्च झाला नाही अशी माहिती सभागृहात सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. पुन्हा एक प्रश्न केला ३५० वे राज्याभिषेक वर्ष नव्हते, पण ते चुकीचे आहे गेल्यावर्षी आपण ३५० वे राज्याभिषेक सोहळा पार पडला. आदर्श राजा म्हणून त्याचे काम पोहचवण्यासाठी आपण विविध कार्यक्रम हाती घेतले अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे.
पाच नोव्हेंबर २०२२ रोजी हजारो शिवभक्त मागणी घेवून आले होते, मग बैठक घेवून अफजलखानच्या कबरीवरील अतिक्रमण हटवण्यात आले. १० नोव्हेंबरला शिवप्रतापदिन साजरी करण्यात आला. मग आपण छत्रपती शिवरायांची वाघनखे मिळावीत म्हणून दिल्लीत पीएम मोदींशी पत्रव्यवहार केला आणि ब्रिटनच्या सरकारशी केला, मग आम्ही पुन्हा पडताळणी केली तेव्हा पत्रव्यवहार केला मग ब्रिटन सरकारने एक वर्षासाठी आपल्याकडे राहिल अशी मंजूरी दिली मग आम्ही पुन्हा प्रयत्न केले मग तीन वर्षासाठी वाघनख आपल्याकडे राहण्यासाठी परवानगी दिली गेली आहे अशी वाघनख आण्याची पूर्ण प्रकिया सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिली.