A resolution to set up a ‘100-bed cashless hospital at the depot’ in a project being created through public-private partnership at ST depots across the state
एसटी महामंडळाच्या राज्यभरातील आगारात सार्वजनिक -खाजगी भागीदारीतून बांधल्या जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये आगार तेथे १०० खाटांचे कॅशलेस रुग्णालय उभारण्याच्या संकल्प असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या योजनेचा शुभारंभ होत आहे. या रुग्णालयात भविष्यात एसटीच्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेबरोबर विविध वैद्यकीय सेवा सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचा फायदा त्या परिसरातील प्रवासी आणि सर्वसामान्य जनतेला देखील मिळणार आहेत अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिली. ठाणे खोपट बसस्थानकातील विश्रांतीगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी यापुढे राज्यभरात एसटी आगारात सार्वजनिक -खाजगी भागीदारीतून निर्माण होणाऱ्या प्रकल्पामध्ये ‘आगार तेथे १०० खाटांचे कॅशलेस रुग्णालय’ उभारण्याच्या संकल्प आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा दिनी या योजनेचा आम्ही शुभारंभ करीत आहोत. भविष्यात या रुग्णालयांमध्ये शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेबरोबर विविध वैद्यकीय सेवा सुविधा मोफत एसटीच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचा फायदा त्या परिसरातील प्रवासी आणि सर्वसामान्य जनतेला देखील मिळणार आहे अशीही माहिती यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा
एसटीला पुन्हा फायद्यात आणण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ‘प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा!’ समजून काम केले पाहिजे.एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आमचे शासन सक्षम आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. ठाणे येथील खोपट बसस्थानकावरील नुतनीकरण करण्यात आलेल्या वातानुकूलित चालक -वाहक विश्रांतीगृहाच्या लोकार्पण आज शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, अर्थ आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, एस. टी. महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक परिवहन आयुक्त विवेक भीमनराव आदी उपस्थित होते.
१९१ बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एसटीचा चेहरा -मोहरा बदलून ” फाईव्ह स्टार ” परिवहन सेवा निर्माण करणे हे आपल्या सरकार समोरील प्रमुख ध्येय आहे. प्रवाशांना एअरपोर्ट सारखे बसपोर्ट उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी- सार्वजनिक भागीदारीतून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर एसटी महामंडळाने भर दिला पाहिजे, गेल्यावर्षी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) माध्यमातून ५०० कोटी रुपये खर्चून एसटीच्या १९१ बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम आपण हाती घेतले असून ” खड्डेमुक्त बसस्थानक ” हा आपला संकल्प असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.