मसाल्यांप्रमाणेच डाळीही आपल्या स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग आहेत. पण रोज डाळ केली जात नाही. अशावेळी बरेच दिवस एका ठिकाणी डाळ पडून राहिल्याने खराब होतात, म्हणजेच डाळींमध्ये किडे होतात. मग तेव्हा सर्व डाळ फेकून देण्याशिवाय पर्याय नसतो. पण डाळीतील किडे होण्याचे कारण किती कॅबिनेटमधील ओलावा हेदेखील असू शकते. अशा वेळी डाळींची योग्य साठवणूक करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला डाळी किडे मुक्त हवी असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही सोपे पण प्रभावी मार्ग घेऊन आलो आहोत. त्यांचे अनुसरण केल्यास आपण डाळींमध्ये किडे होण्यापासून वाचवू शकता.
मोहरीचे तेल
तुम्हाला माहित आहे का मोहरीचे तेल लावल्याने डाळींना किड्यांची लागण होण्यापासून रोखता येते. हो? तुम्ही बरोबर वाचलंत. मोहरीच्या तेलात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. जर ते डाळीवर लावले तर ते खराब होण्यापासून रोखतात. याचे आणखी एक कारण म्हणजे मोहरीच्या तेलाच्या तीव्र वासापासून कीटक पळून जातात.
समजा तुम्हाला एक किलो डाळ साठवायची असेल तर त्यासाठी १ चमचा मोहरीचे तेल घ्या. डाळ स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडी असल्याची खात्री करा. यानंतर डाळीत तेल घालून हाताने चोळावे. यानंतर डाळ काही वेळ उन्हात ठेवावी आणि नंतर कोरड्या किंवा हवाबंद डब्यात ठेवावी.
फॉइल पेपर
ओलाव्यामुळे डाळ खराब होऊ शकते. यासाठी फॉईल पेपरचे छोटे छोटे तुकडे करून डाळीच्या डब्यात ठेवावे. यामुळे ओलावा टिकणार नाही.आणि डाळ ही खराब होणार नाही.
कडुनिंबाची पाने
कडुनिंब हे त्याच्या कडवटपणासाठी ओळखले जाते. यात अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत. कडुनिंबाची पाने किडे आणि कीटक नष्ट करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. पाने स्वच्छ चांगले धुतल्यानंतर वाळवून डाळीच्या डब्यात ठेवावे.