स्टार क्रिकेटरने यूपीएससी क्रॅक करण्यासाठी सोडले क्रिकेट, शेवटी बनले IPS

IPS Success Story: आपले चांगले करिअर सोडून नवीन मार्ग निवडण्याची हिंमत मोजक्या लोकांमध्ये असते. मग क्रिकेटसारख्या सध्या ग्लॅमर खेळात चांगले यश मिळाल्यानंतर नवीन मार्ग कोणी शोधेल का? परंतु संघ लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षेच्या तयारीसाठी क्रिकेटला रामराम केला. यूपीएससीची तयारी केली. शेवटी यश मिळवत आयपीएस झाले.

शालेयपासून विद्यापीठापर्यंत खेळात कमवले नाव

आयपीएसमध्ये यश मिळवणारे कार्तिक मधिरा यांची यशोगाथा सर्वांना प्रेरणा देणारी आहे. हैदराबादमधील असलेले कार्तिक मधिराने यांनी क्रिकेटमध्ये चांगले यश मिळवले. 13, 15, 17, 19 वयोगट आणि विद्यापीठ पातळीवर क्रिकेटमध्ये चांगले नाव कमवले. परंतु चांगले यश मिळाल्यानंतर त्यांना सिव्हील सर्व्हीसचे आकर्षण गप्प बसू देत नव्हते. एक अधिकारी बनून समाजाची सेवा त्यांना करायची होती. त्यामुळे त्यांनी क्रिकेट सोडले आणि यूपीएससीची तयारी सुरु केली.

तीन प्रयत्नात अपयश, शेवटी गाठले यश

कार्तिक मधिराने यांनी जवाहरलाल नेहरू टेक्निकल विद्यापीठातून (JNTU) संगणक शास्त्रातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यांनी सहा महिने डेलॉइटमध्येही काम केले. तिथे त्यांना कळले की त्यांचे खरे लक्ष्य क्रिकेट नाही तर नागरी सेवा आहे. कार्तिक यांना यूपीएससीच्या पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये सतत अपयशाला सामोरे जावे लागले. त्यांना पूर्वपरीक्षाही पास करता आली नाही. पण त्याने आपली तयारी सोडली नाही. सामान्य अध्ययनाच्या अभ्यासासोबतच त्यांनी समाजशास्त्र या पर्यायी विषयात सुधारणा केल्या.

यूपीएससीच्या वेगवेगळ्या फेऱ्यांची तयारी करण्याऐवजी एकाच वेळी संपूर्ण परीक्षेची तयारी करण्यावर भर दिला. कार्तिकची ही रणनीती कामी आली. अखेरीस तो चौथ्या प्रयत्नात 2019 मध्ये यूपीएससी उत्तीर्ण झाले. यावेळी त्यांनी 103 वा क्रमांक मिळवला आणि आयपीएस अधिकारी बनले. कार्तिक यांनी आयपीएस कॅडेर मिळाले. लोणावाळा येथे ते एएसपी आहेत. सोशल मीडियावर ते सक्रिय असतात. इंस्टग्रामवर त्यांचे वेगवेगळे फोटो शेअर करत असतात. आता संधी मिळाल्यावर क्रिकेटच्या मैदानात उतरुन फलंदाजीचा आनंद ते घेत असतात.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)