‘इस्रो’ने दिलेल्या माहितीनुसार, भूस्थिर कक्षेत (जमिनीपासून सुमारे ३६ हजार किमी) असलेल्या उपग्रहांवर भू चुंबकीय वादळाचा काहीसा परिणाम झाला. काही उपग्रहांवरील मोमेंटम व्हीलच्या वेगात फरक आढळून आला. विशेषतः एकाच बाजूला सोलार पॅनल असलेल्या उपग्रहांच्या आचरणात ११ मे रोजी बदल दिसून आला. या उपग्रहांच्या कक्षेत अपेक्षित सुधारणा करण्यात आली. इनसॅट ३डीएस आणि इनसॅट ३डीआर यांच्या स्थाननिश्चितीसाठी आवश्यक स्टार सेन्सर वादळाच्या दरम्यान बंद ठेवण्यात आले होते.
उपग्रह——————–जमिनीपासूनची उंची———कक्षेचे दैनंदिन सरासरी आकुंचन (मीटरमध्ये)——————–११ मे रोजी आकुंचन (मीटरमध्ये)
मायक्रोसॅट २ बी—————-४२४——————————-१५० – २०० ———————————————————६००
कार्टोसॅट २ एस—————–५०५——————————-३५ – ५०————————————————————-१८०
कार्टोसॅट ३———————-५०५——————————-३५ – ४०————————————————————-१७०
रिसॅट २ बी शृंखला————-५७४——————————-३० – ४०————————————————————-१६०
ईओएस ०४———————५२४——————————-१० – २०————————————————————-९७
कार्टोसॅट २ बी——————६३०——————————-१० – १५————————————————————-५०
ईओएस ०६——————–७३२——————————–५ – १०————————————————————–२९
एक्स०१————————६४९——————————-१० – २०————————————————————-६४
—————————-
‘आदित्य’, ‘चांद्रयान २’ने केली नोंद
सूर्यावरून उसळलेल्या सौरज्वाळा आणि त्यांच्याशी संलग्न सौरवादळांच्या नोंदी अवकाशातील भारतीय यानांनीही घेतल्याचे इस्रोने सांगितले. लॅग्रेन्ज पॉईंट १ येथे कार्यरत असलेल्या आदित्य एल १ यानावरील अस्पेक्स, सोलेक्स, एचईएल१ ओएस, तसेच मॅग्नेटोमीटरने या घटनेच्या नोंदी घेतल्या. सोलेक्स आणि एचईएल१ ओएसने १० आणि ११ मे रोजी एक्स क्लास तीव्रतेच्या सहा सौरज्वाळांची नोंद केली. चंद्राभोवती फिरणाऱ्या चांद्रयान २ वरील एक्सएसएम या उपकरणाने देखील याच काळात सूर्याकडून आलेल्या उच्च ऊर्जेच्या कणांमध्ये एकाएकी वाढ झाल्याचे नोंदवले.