मला धनंजय मुंडे यांनी स्वत: धमकी दिलीय त्याचे गुंड धमकी देत आहेत. त्याविषयी माझ्या तक्रारींचं निराकरण झालेले नाही. माध्या कारमध्ये रिव्हॉल्वर ठेवले. वाल्मिक कराडने मला मारहार केली, पण एकाही केसमध्ये मला न्याय मिळालेला नाही. केवळ पोलिस स्टेशनला अर्ज पुढे केला आहे एवढं सांगत आहेत. हे त्याचं काम नाही. मला धमक्या येत आहेत. माझ्यावर एवढं प्रेशर आहे की मी उद्या काही बरेवाईट करून घेतले किंवा मला संपवले तर राजकीय महिलांनी तोंड उघडून बोलू नये असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.
माझी एका सुद्धा तक्रारीच निराकरण झालेलं नाही.गाडीत बंदूक ठेवली, वाल्मिक कराड याने मला मारहाण केली. एकाही केसमध्ये न्याय मिळालेला नाही. धनंजय मुंडे याने स्वतः धमकी दिलीय. त्याचे गुंड धमकी देतायत त्यांची तक्रार केली पण त्याचं काय केललं नाही. फक्त पोलीस स्टेशनला अर्ज पुढे केला आहे एवढं सांगतात हे त्यांच काम नाही.मला धमकी येतात यामुळे माझ्यावर एवढं प्रेशर आहे आपण केव्हा आत्महत्या करेन हे सांगू शकत नाही असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.
न्यायाधीश साहेबांचे मी आभार मानते. त्यांच्यामुळे मला न्याय मिळाला. महिला आयोगात राजकीय महिला नको, कारण यामुळे महिलांना न्याय मिळू शकत नाही. मी दिल्लीत सुद्धा तक्रारी केल्या आहेत. आता तर मी रुपालीताईंवर केस टाकणार आहे. तुम्ही किती महिलांना न्याय दिला ते पुरावे दाखवा असेही करुणा शर्मा म्हणाल्या. माझ्या केसमध्ये काही केलेलं नाही.न्याय मिळाला नाही.माझ्या पक्षाच्यावतीने मी लढत आहे, अनेक गोरगरीब महिला माझ्याकडे येत आहेत.म हिला आयोग काम करत नाही म्हणून अनेक महिला माझ्याकडे येत आहेत असेही करुणा शर्मा यावेळी म्हणाल्या.
रुपालीताई माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही राजीनामा द्या.एक महिला म्हणून सांगतेय हे पद राजकीय पद नाही. तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे राजीनामा द्या. एकेक पुरुष तीन तीन लग्न करतायत जर महिला आयोगाने काम केल असतं तर हे झालं असतं का? मी महिला आयोगात कमीत कमी 6 तक्रारी दिल्या आहेत. वाल्मिक कराड याने मला मारलं. तेव्हा मलाही वाटलं मी आत्महत्या करावी पण मी केली नाही कारण माझी आई मी लहानपणी गामावली होती, ते दुःख मला माहिती आहे माझ्या मुलांना ते द्यायच नाही असेही करुणा शर्मा यावेळी म्हणाल्या.
रुपालीताईंना विनंती करते
आता माझ्यावर एवढं प्रेशर आहे, हे मंत्री संत्री बसलेले आहेत ते काहीही काम करत नाहीत. रुपालीताईंना विनंती करते तुम्ही राजीनामा द्या.राजकीय महिलांना माझी विनंती आहे माझा मर्डर झाला किंवा मी आत्महत्या केली तर माझ्यासाठी कोणी तुमचं तोंड उघडून बोलू नका अशी विनंती करुणा यांनी केली आहे. अजितदादा पूण्याचे पालकमंत्री आहेत, तिथं किती गुंडागर्दी वाढलेली आहे सर्वांना माहिती आहे. बीडला तर धनंजय मुंडेचं राज्य आहे तिकडे कायम असंच सुरूच असते असेही करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.