मला खूप आनंद आहे की आपण WAVES 2025 परिषदे सारखा उपक्रम राबवला आहे, आज त्याचा तिसरा दिवस आहे मला वाटते आपण जर वेगवेगळ्या देशांकडून शिकलो तर आपल्याला फायदा होईल. साऊथ कोरियाचे के पॉप हे म्युझिक इतकं प्रसिद्ध झालं की लोक त्यांची गाणी कळण्यासाठी त्यांची भाषा शिकू लागले आहेत असे अमृता फडणवीस यांनी बीकेसी येथील जिओ वर्ल्डमध्ये भरवलेल्या WAVES 2025 समिटला भेट दिल्यानंतर म्हटले आहे.
त्यापुढे म्हणाल्या की संगित,कला, नाटक हा एक आर्ट फॉर्म आहे. ही भाषा थेट मनाला भिडते. WAVES ने महाराष्ट्रात नाही तर देशात खळबळ माजवली आहे. आणि मला वाटत ही एक सुरुवात आहे, पण यामुळे त्या-त्या देशांशी कल्चरल डिप्लोमसी आणि पॉलिटिकल कनेक्शन मजबूत होतील, आपल्या रिजनल क्लासिकल म्युझिकलाही एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे, ग्लोबली भारतीय संगिताचा प्रचार होईल असेही अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या.
विरोधक टीका करीत आहेत की देशात युद्धजन्य परिस्थिती असतानाही पंतप्रधान या परिषदेला हजर राहीले या संदर्भात प्रश्न विचारले तर त्यांनी मी सांगेन की तुम्ही जमैकन इकॉनॉमी पाहा. कॅरेबियन मधला हा देश आहे. केवळ टुरिझममुळे तो अवलंबून आहे. साऊथ कोरियांचे के पॉप पहा त्यांच्या म्युझिकमुळे लोकांनी विश्वास दाखवला आहे त्यांची भाषा कळत नाही मात्र लोक ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. म्युझिकमुळे त्यांची भाषा शिकण्याची इच्छा झाली आता २ लाखापेक्षा जास्त लोक कोरियन भाषा शिकत आहेत असेही अमृता फडणवीस यांनी सांगितले.
जमैका सारखा देश टुरीझमवर जगत आहेत
आपल्याला ते शिकण्याची गरज आहे जर आपल्यालाही पुढे जायला भेटत असेल तर त्याच्यात मागे नको. म्युझिक कला हे जर ऑप्शन दिसत असेल तर त्याचा आपण वापर केला पाहिजे, यामुळे कल्चरल टुरिझम वाढते आहे आणि याला जर पीएम मोदी सपोर्ट करत असतील तर मला अभिमान आहे असेही अमृता फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.