Skin Care : चेहऱ्यावर दही लावताय? जाणून घ्या फायदे आणि दुष्परिणाम

कडक उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची काळजी घेण्यासाठी, लोकं चेहऱ्यावर गुलाबपाणी, मध, बेसन इत्यादी गोष्टींचा तसेच अनेक प्रकारचे प्रॉडक्ट आणि घरगुती उपचार करतात. यामध्ये दह्याचा देखील मोठ्या प्रमाणाम वापर केला जातो. बरेच लोकं याचा वापर स्किन आणि हेअर केअरसाठी देखील करतात. अशातच काही लोकं दही, बेसन, मध,आणि टोमॅटो यांचे फेसपॅक बनवतात आणि ते चेहऱ्यावर लावतात, ज्यामुळे त्वचा चमकदार राहण्यास मदत होते.

कारण दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी12, प्रथिने आणि प्रोबायोटिक्ससारखे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. हे आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. ते चेहऱ्यावर लावण्याचे काही फायदे आहेत, पण त्याचे काही दुष्परिणामही आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात…

दही लावण्याचे फायदे

त्वचा एक्सफोलिएट करते

दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड आढळते, जे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास उपयुक्त ठरते. याच्या वापराने दही त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी आणि त्वचेची चमक वाढवण्याचे काम करते.

सुरकुत्या कमी होतात

दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील सुरकुत्या आणि डाग कमी करण्यास मदत करू शकतात. त्याचबरोबर त्वचेतील कोलेजन वाढण्यास मदत होते, तसेच दह्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 आढळते, जे त्वचेला सुधारू शकते. दह्यामध्ये थंडावा देणारे गुणधर्म असतात, त्यामुळे ते उन्हापासून बचाव करण्यास मदत करते आणि त्वचेला थंड करू करते.

दही लावण्याचे दुष्परिणाम

ॲलर्जीच्या समस्या

ज्यांची त्वचा खूप संवेदनशील असते, त्या लोकांना किंवा काहींना दह्याची ॲलर्जी असू शकते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ येणे व जळजळ होऊ शकते. जर एखाद्याला दह्याची अ‍ॅलर्जी असेल तर ते वापरू नये.

जळजळ किंवा लालसरपणा

दही सामान्यतः किंचित आम्लयुक्त मानले जाते. अशा परिस्थितीत, ते त्वचेवर लावल्याने जळजळ, खाज सुटणे आणि लालसरपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात, विशेषतः ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी ते वापरणे टाळावे. याशिवाय, दही आणि लिंबू लावल्याने त्वचेला हानी पोहोचू शकते, कारण दोन्हीही आम्लयुक्त असतात.

जर तुम्ही पहिल्यांदाच तुमच्या त्वचेवर दही लावत असाल तर यांचा उपाय करण्यापूर्वी तुम्ही पॅच टेस्ट करायलाच हवी, विशेषतः संवेदनशील त्वचा असलेल्यांनी. याशिवाय, दह्यात बेसन किंवा लिंबू मिक्स करून तुम्ही जे उपाय करता त्याचा त्वचेवर परिणाम होतो. म्हणून, ज्या गोष्टींची तुम्हाला ऍलर्जी आहे किंवा ज्या खूप आम्लयुक्त आहेत अशा गोष्टी वापरू नका.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)