महिलांमध्ये एनीमिया म्हणजे रक्ताची कमी बऱ्याचदा आढळून येते. बी 12 रेड ब्ल्ड सेल्स बनवण्यासाठी आवश्यक आहेत. म्हणून लक्षणांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
44-45 वर्षाच्या महिला मोनोपॉजच्या फेजमध्ये असतात. त्यावेळी वाढत्या वयात शरीरात विटामिन बी 12 च्या कमतरतेमुळे जास्त समस्या निर्माण होऊ शकतात.
हात-पाय सून्न होणं, विसरणं, लवकर थकणं, नसांमध्ये कमतरता अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका. हे बी 12 च्या कमतरतेचे संकेत आहेत.
महिलांनी शरीरातील बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी रोज आपल्या डाएटमध्ये दुधाचा समावेश करावा. त्यामुळे वाढत्या वयात हाडं मजबूत राहतील.
मांसाहारी असाल, तर ब्रेक फास्टमध्ये अंड्याचा समावेश करा. हा पण बी 12 वाढवण्याचा स्त्रोत आहे, यातून प्रोटीन, कॅल्शियम मिळेल.