प्रतिनिधी, मुंबई : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशा बिरुदावलीसह धावणाऱ्या राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या शिवनेरीने वेगवान प्रवास घडवत वेळ बचतीचा नवा उच्चांक नोंदवला आहे. स्वारगेट ते मंत्रालय असा रस्ते प्रवास अवघ्या साडे तीन तासांत शिवनेरीने पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे, एरव्ही साडे दहाच्या सुमारास मंत्रालयात दाखल होणारा पुण्यातील कर्मचारी आठवडयाच्या पहिल्याच दिवशी साडे नऊच्या ठोक्याला मंत्रालयाच्या दाराशी हजर होता.रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अनेक थांबे यामुळे पुण्यातून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांना चार ते साडे चार तासांचा वेळ लागतो. त्यातच थेट मंत्रालय गाठायचे असल्यास दादरवरून अधिक अर्धा तास असे वेळेचे गणित आहे. मात्र आज सोमवारी एसटीच्या शिवनेरीने स्वारगेटहून सकाळी ६ वाजता मंत्रालयाच्या दिशेने धाव घेतली आणि अटल सेतू मार्गे ९ वाजून ३० मिनिटांनी मंत्रालय परिसरात पोहोचली. वेळेची बचत आणि थेट सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे हि सेवा अधिकच लोकप्रिय ठरत आहे.
सामान्यतः मंत्रालय, विधिमंडळ व उच्च न्यायालयातील शासकीय कर्मचारी तसेच फोर्ट आणि कुलाबा परिसरातील खाजगी कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना दर आठवड्याला ये-जा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार एसटीने स्वारगेट -मंत्रालय -स्वारगेट शिवनेरी बस सेवा सुरू केली आहे. वेळेची बचत आणि थेट सेवा यामुळे अल्पावधीतच अटल सेतू मार्गे धावणारी हि बस सेवा लोकप्रिय झाली आहे. स्वारगेट-मंत्रालय शिवनेरीची आसन क्षमता ४५ आहे. पहिल्या थांब्यावरच प्रवाशांनी पूर्ण भरलेली होती.

आगाऊ आरक्षणासाठी हि बस सेवा एसटीच्या Mobile Bus Reservation app वर उपलब्ध करून दिली असून npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावरून देखील तिकीट आरक्षित करता येते. यांमुळे मुंबई पुणे दरम्यान ऐटशीर, वातानुकूलित आणि जलद प्रवासासाठी शिवनेरीने नक्की प्रवास करा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.