कुणाल कामरा यांच्या सेटची तोडफोड, शिवसैनिकांनी अंधेरी एमआयडीसीत सेट तोडला

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबन करणारे गाणे तयार केल्याने त्याच्या अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सेटची ४० ते ५० शिवसैनिकांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. कुणाल कामरा याच्या गाण्याचा व्हिडीओ नुकताच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांवर शेअर केला होता. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला होता.त्यानंतर काही मिनिटांनी हा हल्ला झाला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणावर कुणाल कामरा नेहमीच आपल्या नर्म विनोदी शैलीत टीप्पणी करीत असतात. शिवसेनेतून बाहेर आली. राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर आली. हा प्रकाराने सर्वच कन्फूज झाले. हा प्रकार एकाने सुरु केला होता, असे गाण्याचे बोल आहेत. त्याच पुढे  ‘ठाणे की रिक्षा, चेहरे पर दाढी, ऑखो पे चष्मा हाये..….मेरी नजर से दोखो तो गद्दार नजर आये….हाय आहे…असे  एकनाथ शिंदे यांची टींगल केल्याने  शिवसेना आक्रमक झाली होती.

मुरजी पटले यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणात अंधेरीच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात कुणाल कामरा याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तोडफोडी वेळी स्टुडिओत प्रेक्षक होते. त्यांना आधी बाहेर काढण्यात आले त्यानंतर सेटची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात येते. स्वत: च्या प्रसिद्धीच्या हव्यासाठी अशा प्रकारे आमच्या नेत्याची बदनामी आम्ही खपवून घेणार नाही असे वक्तव्य काही वेळापूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले होते.  त्यानंतर काही वेळात हा हल्ला झाला आहे. या प्रकरणात आता पुढील कारवाई काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

संजय राऊत यांचे ट्वीट काय होते –

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)