शिवसेना उबाठाच्या नाशिकमधील शिबिरात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे न ऐकलेले भाषण ऐकवणार

Balasaheb Thackeray Speech: शिवसेनेचे विभागीय शिबीर १६ एप्रिल रोजी नाशिकमध्ये होत आहे. या शिबिरात संध्याकाळी ६.३० वाजता उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराचे उद्घघाटन युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. शिवसेना उबाठाचे नेतेसुद्धा या शिबिरात मार्गदर्शन करणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे न ऐकलेले भाषण या शिबिरात ऐकवण्यात येणार आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे भाषण आहे, अशी माहिती शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी दिली. ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे या शिबिरात सहभागी होणार आहेत. असीम सरोदे यांनी शिवसेना उबाठाला नेहमी कायदेशीर मदत केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांना टोला

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी चिंता करु नये. त्यांनी अमेरिकेतील गुप्तचर संस्थेच्या प्रमुख तुळशी गबार्ड यांनी सांगितलेल्या वक्तव्याचा विचार करावा. त्याबद्दल चिंतन करावे. ईव्हीएम हॅक होऊ शकत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणुकीसाठी आम्हाला अमित शाह यांचे पाय चाटण्याची गरज नाही. संजय राऊत कधी सत्तेसोबत गेले नाही.

अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख केला. त्यांनी औरंगजेबच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला. त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको. भ्रष्ट आणि चोर मंडळ तुमच्यासोबत बसले आहे.  लबाड्या करुन तुम्ही सत्तेवर आला आहात, तुम्हाला ती सत्ता लखलाभ हो, असे संजय राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस अनेक वाद मिटवतात. औरंगजेबचा कबरीचा वाद अंगलट आल्यावर त्यांनी मिटवला. मराठा समाजाचा वाद त्यांनी मिटवला. मग महात्मा फुले यांच्या चित्रपटास ब्राह्यण संघटना विरोध करत आहे. त्या संघटना देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबाहेर आहेत का? या चित्रपटात आक्षेपार्ह काय आहे. चित्रपटात जे आहे, ते महाराष्ट्र सरकारच्या साहित्यात आहे. या विषयावर देवेंद्र फडणवीस अद्याप का बोलले नाही, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.

हे ही वाचा…

‘ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण…’, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)