मोठी बातमी समोर येत आहे, गेल्या काही दिवसांपासून फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील काही पेजच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गट आणि पक्षातील प्रमुख नेत्यांवर वादग्रस्त टीका सुरू आहे. आता या प्रकरणाची गंभीर दखल शिवसेना ठाकरे गटाकडून घेण्यात आली आहे. याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे सचिव साईनाथ दुर्गे यांनी सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन, लेखी स्वरूपात तक्रार केली आहे. ‘अशी बदनामीकारक, चुकीची माहिती पसरविणाऱ्या या सोशल मिडिया पेजवर बंदी घालून, पेज चालविणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी,’ अशी मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. याबाबत पक्षाच्या वतीनं ट्विट करत माहिती देण्यात आली आहे.
ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं?
‘महाराष्ट्रात इव्हीएमच्या माध्यमातून प्रचंड बहुमताची सत्ता मिळवली, तरी सत्ताधाऱ्यांच्या कुरघोड्या कमी होत नाहीयत. जनहित साधायचं सोडून, सोशल मीडियाद्वारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा अपप्रचार, पक्षाच्या विचारसरणीला वाईट दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील ‘फशिव सेना’ ह्या पेजवरून पक्षातील नेत्यांचे फोटो, व्हिडीओ मॉर्फ करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी माहिती शेअर केली जातेय. ह्याविरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव साईनाथ दुर्गे ह्यांनी सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन, लेखी स्वरूपात तक्रार केली. अशी बदनामीकारक, चुकीची माहिती पसरविणाऱ्या ह्या सोशल मिडिया पेजवर बंदी घालून, पेज चालविणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी ह्या तक्रारीत केली.’ असं ट्विट पक्षाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात इव्हीएमच्या माध्यमातून प्रचंड बहुमताची सत्ता मिळवली, तरी सत्ताधाऱ्यांच्या कुरघोड्या कमी होत नाहीयत. जनहित साधायचं सोडून, सोशल मीडियाद्वारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा अपप्रचार, पक्षाच्या विचारसरणीला वाईट दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. फेसबुक आणि… pic.twitter.com/uVrvLNlCsY
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 15, 2025
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील काही पेजच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गट आणि पक्षातील प्रमुख नेत्यांवर वादग्रस्त टीका सुरू आहे. आता या विरोधात ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. पक्षाच्या वतीनं सायबर सेलकडे धाव घेण्यात आली आहे, आता या प्रकरणात काय कारवाई होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.