औरंगजेबची कबर तोडणाऱ्याला १०० गुंठे जमीन आणि ११ लाख रोख देणार, शिवसेना नेत्याने केली घोषणा

मुघल बादशहा औरंगजेबाच्या कबरीवरुन देशात वातावरण तणावाचे असताना आता नागपूरात या प्रकरणावरुन दोन गटात राडा झाल्याची घटना शांत होत असताना पुन्हा शिवसेनेच्या एका नेत्याच्या घोषणे वरुन टेन्शन वाढले आहे. या प्रकरणात आता युपीमध्ये वातावरण तापवण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरात औरंगजेबाची कबर तोडणाऱ्याला पाच बिघा जमीन म्हणजे ( १०० गुंठे ) आणि ११ लाख रोख रक्कम देण्याची घोषणा शिवसेनेच्या नेत्याने केली आहे.

नागपूरात औरंगजेबाची कबर तोडण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेने मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर सायंकाळी अचानक दोन गट समोरासमोर आल्याने दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्याने वातावरण तापले आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर उखडून देशाबाहेर टाकण्याची मागणी केली आहे. त्यातच आता युपीच्या मुझफ्परनगर येथे देखील यामुळे वातावरण तप्त झाले आहे. येथे एकनाथ शिंदे गटाचे स्थानिक नेते जिल्हाध्यक्ष बिट्टू सिखेडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात औरंगाबाद येथील औरंगजेबाची कबर तोडणाऱ्या ५ बिघा जमीन ( १०० गुंठे ) आणि ११ लाख रुपये रोख बक्षिस जाहीर केले आहे.

औरंगजेबाचे समर्थन करणाऱ्यांना चप्पलेने मारले

शिवसेना कार्यकर्त्यांनी नागपुर राड्याच्या पार्श्वभूमीवर युपीच्या मुजफ्फरनगर जिल्हा कार्यालयासमोर  दुपारी जोरदार निदर्शने केली. यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणेबाजी केली आणि औरंगजेबचे समर्थन करणाऱ्या विरोधा नारेबाजी केली. यावेळी पीएम मोदी यांच्या नावाने एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यावेळी औरंगजेबाचे समर्थन करणाऱ्यांना चप्पलेने मारले पाहीजे असे जिल्हाध्यक्ष बिट्टू सिखेडा यांनी म्हटले आहे. यावेळी देशातल्या मुगल शासनाच्या सर्व कबरी आणि त्यांच्या नावाच्या पाट्या उखडून काढले पाहीजेत अशी मागणी केली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)