Shirur Lok Sabha: आता त्यांना घरी बसवा, लोकसभेसाठी ढळढळराव नको; भास्कर जाधवांचा आढळरावांना टोला

नारायणगाव (प्रशांत श्रीमंदिलकर) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली, तेव्हा ते अत्यवस्थ होते, अशा वेळी शिवसेनेतील काही गद्दार नेत्यांनी त्यांचा घात करून राज्यातील लोकहितवादी सरकार पाडण्याचे काम केले, यांपैकी आढळराव एक आहेत, त्यांचे नाव आढळराव आहे, मात्र ते सतत ढळ ढळ करत असतात, त्यामुळे त्यांना घरी ढळू द्या आणि आपल्या शिवाजन्मभूमीचा अचल, अविरत कार्यरत असणारा मावळा डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवा, असे आवाहन भास्कर जाधव यांनी केले आहे.जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे महाविकास आघडिचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत भास्कर जाधव बोलत होते. यावेळी त्यांनी आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
Nashik Lok Sabha नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट; तळपत्या उन्हात छगन भुजबळ निवडणुकीच्या रिंगणात, सर्वांच्या भुवया उंचावल्या

स्व. बाळासाहेब ठाकरेंशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करून; स्वार्थासाठी सतत पक्ष बदलणाऱ्या आढळरावांना आता घरी बसावा आणि छत्रपतींना आदर्श मानून अचल, अविरत कार्यरत असणाऱ्या निष्कलंक खा. डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवून गद्दारांना मातीत गाडा असं देखील जाधव म्हणाले आहे.

जाधव म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असताना खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी या मतदार संघाचे नाव सबंध देशात तर पोहोचवल आहे. त्याहीपेक्षा त्यांनी आदराचे एक स्थान निर्माण करून आपल्या मतदारसंघाचा गौरव वाढवला. देशभरात कुठेही गेलं तर छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेल्या शिरूर मतदार संघाचे प्रतिनिधी असणाऱ्या खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या भाषणाची चर्चा ऐकायला मिळते, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

भाजपा आणि संघाने छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं काम केले. मात्र खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास सबंध जगासमोर आणला. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असणाऱ्या वढू तुळापूर साठी महाविकास आघाडीने तब्बल २५० कोटींचा निधी मंजूर केला. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा जागर करणाऱ्या शिवाजन्मभुमीच्या या मावळ्याला पुन्हा एकदा संसदेत पाठवून राष्ट्रीय कार्य पार पाडा, असे आवाहन भास्कर जाधव यांनी केले.