चमकदार चेहरा ते जाड लांब केस… कोरफड जेलचे हे उपाय आहेत कमालीचे, जाणून घ्या

कोरफड आयुर्वेदात खुप गुणकारी मानली जाते. कारण आयुर्वेदात, कोरफडीचा वापर अनेक औषधे बनवण्यासाठी केला जातो. ज्याद्वारे आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यापासुन आपल्याला मुक्तता मिळते. त्यामुळे कोरफड ही आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कोरफडीचा रस पिण्यापासून ते जखमांवर लावण्यापर्यंत तसेच निरोगी त्वचा आणि केसांसाठी देखील वापरले जाऊ शकते. कोरफडीमध्ये अनेक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात. तुम्ही ते वेगवेगळ्या प्रकारे देखील वापरू शकता. आजच्या लेखात, आपण कोरफडीशी संबंधित अशाच काही उपायांबद्दल जाणून घेणार आहोत जे केस आणि त्वचेशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात.

नैसर्गिक गोष्टींचा वापर तुमच्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी अधिक फायदेशीर मानला जातो. जरी ऑर्गेनिक गोष्टींचा प्रभाव लगेच होत नसुन काही वेळ लागतो. पण या ऑर्गेनिक वस्तुच्या वापराणे आपल्या आरोग्यावर तसेच शरीरावर चांगले परिणाम दिसतात आणि यांच्या वापरणे कोणतेही दुष्परिणाम होत नाही. म्हणूनच आपल्या आजी घरगुती उपचारांचा खूप वापर करायच्या. अशातच त्वचा आणि केसांसाठी कोरफडी जेलचे उपाय जाणून घेऊया.

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक वाढेल

प्रत्येकाला आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक हवी असते. यासाठी कोरफड जेलमध्ये तुम्ही व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यापासून मानेपर्यंत लावा आणि २० ते २५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा पॅक वापरल्याने काही दिवसांतच चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी होऊ लागतात आणि त्वचा स्वच्छ होते. यामुळे त्वचाही घट्ट होते.

केस रेशमी-चमकदार होतील

कोरफडीमध्ये हायड्रेटिंग गुणधर्म असतात, जे त्वचेला तसेच केसांना ओलावा देतात. कोरफड जेल अधिक फायदेशीर करण्यासाठी यात दही आणि अंड मिक्स करा आणि केसांना लावा. हा हेअर पॅक लावल्यानंतर तुम्हाला पहिल्याच वेळी उत्तम रिझल्ट मिळतील.

कोरडी त्वचा मऊ होईल

ज्या लोकांची त्वचा जास्त कोरडी असते. त्यांच्यासाठीही कोरफड हा एक उत्तम घटक आहे. यासाठी कोरफड जेलमध्ये मध, गुलाबजल आणि दोन ते तीन थेंब खोबरेल तेलात मिक्स करा आणि ते लावा. यामुळे त्वचा मऊ होते आणि कोरडेपणा कमी होतो.

कोरफड कोंडा दूर करते

केस गळतीचे एक प्रमुख कारण म्हणजे कोंडा. यापासून मुक्तता मिळवण्यासाठी, कोरफड जेलमध्ये दही आणि लिंबाचा रस मिसळून करता येतो. याशिवाय, कोणत्याही सौम्य स्क्रबमध्ये थोडेसे कोरफड जेल मिक्स करा आणि ते स्कॅल्प वर लावून मसाज करा आणि नंतर केस धुवा. यामुळे कोंडा देखील कमी होतो. आठवड्यातून एकदा असे केल्याने तुम्ही कोंड्यापासून लवकर मुक्त होऊ शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)