नाशिकमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला प्रतिकात्मक फाशी देत शिंदेंच्या शिवसेनेने आंदोलन केलं आहे. यावेळी वाल्मिक कराडला फाशी द्या अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली.
बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वस्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे महायुतीतल्या शिंदेंच्या शिवसेनेने आज वाल्मिक कराड याला प्रतिकात्मक फाशी देत नाशिकमध्ये आंदोलन केलं आहे. यावेळी कराड आणि इतर आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.