क्लीन देणं चीट हाच मोठा घोटाळा
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली असून त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ” शिखर बँक घोटाळ्यासंदर्भात क्लीन चीट मिळणं हाच सर्वात मोठा घोटाळा आहे. हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप करायचे. पुन्हा त्यावर खटला चालवण्यासाठी सरकारच्या खात्यातून लाखो रुपये खर्च करायचे. नंतर तो आरोपी पक्षात आला की त्याच्यासोबत गोड वागायचे. खटला सुरू असताना होणारा खर्च कुणाकडून घेणार आहात? नरेंद्र मोदींकडून घेणार आहात का? ” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
फुटलेल्या आमदारांवर कॉंग्रेस कारवाई करणार
राऊत यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंगवर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की ” विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झालं हे कॉंग्रेसने मान्य केलं आहे. ज्या लोकांनी क्रॉस व्होटिंग केलं त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे आणि जमीन देण्यात आली. आमदारांना पैसे देऊन मत फोडणे ही संविधानाची हत्या नाही का? अमित शहा आणि नरेंद्र मोदी हेच खरे संविधानाची हत्या करत आहेत. त्यांनी कॉंग्रेसच्या आमदारांचा आणि चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडून आणला. त्यामुळे कॉंग्रेस फुटीर आमदारांवर नक्कीच कारवाई करेल.”
चंद्रबाबूंच्या भेटीमुळे हुरळून जाण्याची गरज नाही
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली यावर संजय राऊत म्हणाले की, ” चंद्राबाबू आणि महाराष्ट्र या दोघांचे काय समीकरण आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या राज्यातील आलेले मुख्यमंत्री भेटत असतात हा शिष्टाचाराचा भाग आहे. त्यामुळे हुरळून जाण्याची गरज नाही”.