सटासट गॅस मोकळा होईल… पोट फुगणं थांबेल, फक्त स्वयंपाकघरातील ‘हे’ पदार्थ खा

सण उत्सवाच्या काळात आपण भरपूर पदार्थ खातो. कधी न खाणारेही पदार्थ खातो. त्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही. पचनक्रिया बिघडते. सणांच्या काळात एकीकडे तळलेली भजी, दुसरीकडे चहा, कोल्ड्रिंक्स घेतल्या जातं. पण जास्त प्रमाणात तळले तिखट खाल्ल्यामुळे अचानक पोट बिघडतं. त्यानंतर काहीही खाल्ल्यावर पोटात गॅस (Stomach Gas) होऊ लागते. अॅसिडिटी होते आणि पोट फुगते. जर तुम्हीही पोटात गॅस होण्याच्या त्रासाने वारंवार त्रस्त असाल, तर गॅसपासून मुक्त होण्याची युक्ती जाणून घ्या. स्वयंपाक घरातील काही मसाले असे आहेत की, ते तुमच्या पोटातील गॅसची समस्या चुटकीसरशी दूर करतात.

ओवा खा

पोटांच्या समस्यांवर ओवा हा प्रभावी मसाला आहे. ओव्याचे दाणे हलके तळून चघळल्यास पोटातील गॅस दूर होतो. अॅसिडिटीपासून आराम मिळतो आणि हे दाणे कब्जापासूनही मुक्तता देतात. ओव्याचं पाणी पिऊ शकता. ओव्याचं पाणी तयार करण्यासाठी, अर्धा चमचा ओव्याचे दाणे एक कप पाण्यात टाकून उकळा. आणि हे कोमट पाणी प्या. यामुळे पोटाला आराम मिळतो आणि पचन क्रिया सुरळीत होते.

बडीशेप

बडीशेप पोटाला थंड ठेवण्याचे काम करते. बडीशेप खाल्ल्याने पचनाची क्रिया सुधारते, मसल्स रिलॅक्स होतात, गॅस कमी होतो, फुगलेले पोट योग्य होते,, अपचनाची समस्या दूर होते, आणि पचन तंत्र डिटॉक्स होते. त्यामुळे जेव्हा पोट फुगल्यासारखे वाटत असेल, तेव्हा एक चमचा बडीशेपचे दाणे चघळा. यामुळे पोटाची गॅस कमी होईल. म्हणूनच, रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये जेवणानंतर बडीशेप दिली जाते. पोटाच्या गॅसपासून मुक्त होण्यासाठी बडीशेपचे पाणी देखील पिऊ शकता.

जीरा बेस्ट उपाय

पचन तंत्राला फायदे देणाऱ्या मसाल्यांमध्ये जीरे (Jeera) देखील आहे. जीरे अँटीऑक्सिडन्ट्सने भरपूर असतो. जीऱ्याच्या दाण्यांमध्ये फायदेशीर जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. यात लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारख्या खनिजांचा चांगला स्रोत असतो. जीरे खाल्ल्याने पोटातील गॅस कमी होते. हलके भाजलेल्या जिऱ्याचे दाणे खा. जीरे पावडर दही किंवा ताकामध्ये घालून प्यायल्यास गॅसपासून आराम मिळतो. तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी जीरे पाणी पिण्याची सवय करू शकता. यामुळे पोटाची समस्या कमी होते आणि त्याचे चरबी कमी करण्याचे गुण वजन कमी करण्यातही प्रभावी ठरतात. जीरे पाणी तयार करण्यासाठी, एका ग्लास पाण्यात एक चमचा जीऱ्याचे दाणे रात्री भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गरम करून रिकाम्या पोटी प्या.

‘या’ गोष्टी ध्यानात ठेवा

  • जर तुम्हाला पोटात गॅस होण्याची समस्या असत असेल, तर याचे कारण तुमच्या काही छोट्या सवयींमध्ये असू शकते. पोटातील गॅस कमी करण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवा:
  • अन्न चांगल्या प्रकारे चावून खा.
  • एकाच वेळी जास्त खाण्यापेक्षा पोर्शन कंट्रोल ठेवा आणि थोडे-थोडे खा.
  • ड्रिंक्स स्ट्रॉने प्यायच्या ऐवजी ग्लासातून प्या. स्ट्रॉने पोटात अधिक हवा जात असल्याने गॅस होऊ शकतो.
  • स्वत:ला हायड्रेटेड ठेवा आणि पुरेसे पाणी प्या.
  • व्यायाम केल्याने पोटाच्या समस्या दूर राहतात.
(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)