Professor ends life- मिरज येथील प्राध्यापकाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत त्यांनी हे पाऊल उचलले आहे. दोन महिन्यापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते.
२६ वर्षीय बाळकृष्ण अनिल शिंदे यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. बाळकृष्ण हे टाकळी रस्ता, मिरज येथे राहत होते. आत्महत्या करण्याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. बाळकृष्ण यांचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. गुरूवारी रात्री ही घटना घडली. अशी माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरज शहरातील महाविद्यालय शिंदे हे सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत होते. त्यानी गळफास घेतला हे लक्षात येताच कुटुंबियांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात भरती केले. परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवविला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती.या घटनेप्रकरणी मिरज पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळकृष्ण शिंदे यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर भूगोलशास्त्रज्ञ अशी माहिती दिली आहे. शिंदे हे भूगोल विषयाचे प्राध्यापक होते. २२ डिसेंबर रोजी त्यांचे लग्न झाले होते.लग्नासंबंधी व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले होते. बाळकृष्ण यांच्या आत्महत्येमुळे शिंदे कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.
मानसिक तणावा खाली एका तरुणीची आत्महत्या
भंडाऱ्यात मानसिक तणावाखाली असलेल्या एका २० वर्षीय तरुणीने ७ मार्चला आत्महत्या केली होती. प्रणाली रवी भुरले असे त्या तरुणीचे नाव आहे. ही तरुणी एका महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकत होते. काही दिवसांपूर्वीच या तरुणीचे लग्न ठरले होते. तरुणीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी गावातील ३० वर्षीय तरुण रंजित घराटे याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता या तरुणाचेही लग्न ठरले होते. सलग दोन दिवसात अशा घटनांमुळे अनेक तर्कवितर्क काढले जात असून पोलिस या घटनांचा तपास घेत आहे.