शरद पवार गटाला भूकंपाचा धक्का बसणार?, फोन केलेले दोन नेते अजितदादांना भेटले, थेट पक्षप्रवेशावर चर्चा

महाराष्ट्रात एका बाजूला सत्तास्थापनेच्या हालाचालींन वेग आलेला असताना दुसरीकडे विरोधकांना धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. श्रीगोंदा विधानसभेत बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. तर दुसरीकडे शिराळा मतदार संघाचे माजी आमदार मानसिंग नाईक हे अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यामुळे आता राहुल जगताप आणि मानसिंग नाईक हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.

बातमी अपडेट होत आहे…

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)