भाजपचा शरद पवारांना मोठा दणका, दोन बड्या नेत्यांचा प्रवेश, सात नगरसेवकही फुटले

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं, महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं, 232  विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं. विधानसभा निवडणुकीत भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला.

दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं चित्र आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसला आहे. पक्षाला लागलेली गळीत रोख्यण्याचं मोठं आवाहन आता या दोन पक्षांपुढे आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्क बसला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ आणि माजी नगराध्यक्ष संजय वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे कर्जत जामखेडमध्ये देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे, सात नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दोन बड्या नेत्यांनी आणि सात नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा  

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे, मात्र यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आधीच स्पष्ट केलं आहे, आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सध्या तरी या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)