मुंबई: भटकती आत्मा अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा उल्लेख केला. पवार कृषीमंत्री असताना त्यांनी काय केलं, ज्यांना कुटुंब सांभाळता आलं नाही, ते देश काय सांभाळणार, असे सवाल करत मोदींनी शरद पवारांवर टिकेची झोड उठवली. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्रात होत असलेल्या सभांमध्ये मोदी शरद पवारांना सातत्यानं लक्ष्य करत आहेत. कृषीमंत्री असताना काय केलं, या मोदींच्या प्रश्नाला पवारांनी उत्तर दिलं आहे.
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या राज्यात शेतीचा प्रश्न बिकट होता. शेती समस्या सोडवण्यात त्यावेळी मोदींना मदत केली होती, असं म्हणत पवारांनी भूतकाळातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. ‘कृषी क्षेत्रातील समस्या घेऊन मोदी माझ्याकडे अनेकदा यायचे. ते मला गुजरातदेखील घेऊन गेले होते. शेतीमधील अभिनय प्रयोग, शेतीच्या आधुनिक पद्धती पाहण्यासाठी एकदा मोदींना इस्रायलला जायचं होतं. त्यांना मी तिथेही घेऊन गेलो होतो. त्यामुळे मोदी आता काय म्हणताहेत, याची फिकीर मी करत नाही,’ असं पवार पुढे म्हणाले. शरद पवार २००४ ते २०१४ या कालावधीत केंद्रात कृषीमंत्री होते.
पंतप्रधान मोदी गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांना सातत्यानं लक्ष्य करत आहेत. कृषीमंत्री असताना पवारांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काहीच केलं नाही, अशी टीका मोदी पवारांवर करत आहेत. गेल्या १० वर्षांमध्ये भाजप सत्तेत आहे. या काळात शेतकऱ्यांना मोठा फायदा झाल्याचं मोदी वारंवार सांगतात. ‘मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी शेतीची प्रगती, विकास याबद्दल आग्रही होते. त्यांना कृषी विषयात रस होता. पण आता ते केवळ राजकारणाबद्दल बोलतात,’ असा टोला शरद पवारांनी लगावला.

अर्थसंकल्पातील १५ टक्के निधी मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा विचार होता, असा दावा मोदी प्रचारसभांमधून करत आहेत. मोदींच्या दाव्यात कोणतंही तथ्य नसल्याचं पवार म्हणाले. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प देशाचा असतो. तो काही एका धर्माचा किंवा जातीचा नसतो. त्यामुळे अर्थसंकल्पातील निधीचं वाटप जाती आणि धर्माच्या आधारावर कधीच होणार नाही, असं शरद पवार म्हणाले.