Sharad Pawar: लोकसभेनंतर अजित पवारांना पुन्हा धक्का? पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काकांकडून सुरुंग लावण्यास सुरुवात

पिंपरी : लोकसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची अवघी एक जागा आल्याने त्यांची नामुष्की झाली आहे. तर लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेसाठी डाव टाकायला सुरुवात केली आहे. अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांनी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह १६ माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश देखील होणार आहे. त्यामुळे अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात पवारांनी सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे, असे सध्या चित्र आहे.

निवडणुकीमध्ये अजित पवारांना मिळालेल्या अपयशानंतर भविष्यात त्यांच्यासोबत राहणं योग्य आहे, अशी खदखद येथील काही नगरसेवकांच्या मनात आहे. त्यामुळेच की काय माजी नगरसेवकांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली आहे. यातच भोसरीचे माजी आमदार विलास लांडे शरद पवारांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटी गाठींमुळे अजित पवार गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पुरुषी मक्तेदारी मोडित, राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक
लोकसभा निवडणुकीनंतर अनेक जण घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडून रणनीती आखण्यास सुरूवात झाली आहे. शरद पवारांची भेट घेतलेल्या आठ माजी नगरसेवकांची नावे देखील समोर येत आहेत. त्यामध्ये अजित पवार गटाचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, विलास लांडे यांचे सुपुत्र विक्रांत लांडे, समीर मासुळकर, संजय वाबळे, राहुल भोसले, विनया तपकीर, वैशाली घोडेकर या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची नुकतीच भेट घेतली आहे. त्यांचा पक्षप्रवेश देखील होणार असं असल्याची माहिती समोर आली आहे.
दादा, भाऊंना पाडण्याची तयारी, मविआच्या गोटात जोरदार हालचाली; दोन्ही उपमुख्यमंत्री रडारवर
दरम्यान, येणाऱ्या काळामध्ये अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये काहीजण घरवापसी करण्याच्या मनस्थितीत दिसत आहेत. याचा मोठा फटका अजित पवारांना बसू शकतो. येत्या काही दिवसांमध्ये पिंपरी चिंचवड मधील चित्र स्पष्ट होणार आहे.