शरद पवारांना हे दाखवून दिलं आहे की कोणी त्यांच्यासोबत असेल नसेल तरी निवडणूक जिंकण्यासाठी फक्त पवारांचं नावच काफी आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह मिळालं. तर शरद पवार गटाने जवळपास सारंच काही गमावलं होतं. त्यांचे खासदार-आमदार-कार्यकर्ते गेले, पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्हंही गेलं. उरलं फक्त शरद पवार हे नाव. पुन्हा नव्या जोमाने कामाला लागत शरद पवारांनी पक्षाला उभं केलं. ८३ वर्षांच्या या पेहेलवानाने त्याची ताकद काय आहे हे या निवडणुकीत दाखवून दिलं आहे. पवार गटाने लढवलेल्या १० पैकी १० जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पवार पावर पाहायला मिळत आहे.
कोण कुठून आघाडीवर?
बारामती – सुप्रिया सुळे – २६०९४ हजार मतांनी आघाडीवर
शिरुर – अमोल कोल्हे – ३६८१५ मतांनी आघाडीवर
बीड – बजरंग सोनवणे – ८ हजार मतांनी आघाडीवर
दिंडोरी – भास्कर भगरे – ६९८६ मतांनी आघाडीवर
सातारा – शशिकांत शिंदे – १४००० मतांनी आघाडीवर
वर्धा – अमर काळे – १२०६८ मतांनी आघाडीवर
भिवंडी – बाळ्यामामा म्हात्रे – १२, ३०६ मतांनी आघाडीवर
माढा – धैर्यशील मोहिते पाटील – ८४४६ मतांनी आघाडीवर
अहमदनगर दक्षिण – निलेश लंके – ११ वाजेपर्यंतच्या कलांमध्ये आघाडीवर
रावेर – श्रीराम पाटील – १० वाजेपर्यंतच्या कलांमध्ये आघाडीवर