40 हजार रुपयांसाठी महिलेचा मृतदेह 6 तास अडवून ठेवला,आंदोलनाचा इशारा देताच,काय घडले पाहा ?

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अनामत रक्कम भरली नाही म्हणून उपचार बुलढाण्यातील मलकापुर शहरातील हकिमी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृतदेह चाळीस हजार रुपयांसाठी तब्बल सहा तास अडवून ठेवण्याची घटना घडली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया होऊन मृत्यू पावलेल्या एका महिला रुग्णांच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाने आंदोलनाचा इशारा देताच अखेर या महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

मलकापूर तालुक्यातील शिराढोण येथील कमलबाई यादव इंगळे या घरात पाय घसरून पडल्याने त्यांचा डावा हात आणि पाय फ्रॅक्चर होऊन त्या जखमी झाल्या होत्या. त्यांना मलकापूर येथील हकिमी मल्टी स्पेशालीस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ५ एप्रिल रोजी दाखल केले होते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून ७ एप्रिल रोजी रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयात उपचार सुरू असतांना बुधवारी सकाळी ४ वाजताच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र रुग्णालय प्रशासनाने ४० हजार रुपये बिल बाकी असल्याचे सांगत त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास नकार दिला.

रुग्णालयाने आरोप फेटाळले !

वारंवार विनवणी करूनही मृतदेह ताब्यात देत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक यांनी या घटनेची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. याबाबत मात्र हॉस्पिटल प्रशासनाने या आरोपांचे खंडन केल आहे. या महिलेची अनेक कागदपत्रं जमा करणे बाकी होते आणि या महिलेचे राज्य शासनाकडून अप्रुव्हल घेणे बाकी असल्याने कागदी प्रक्रिया करण्यास वेळ लागला. त्यामुळे मृतदेह देण्यास विलंब झाल्याचा दावा हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे. मात्र आम्ही रुग्णाच्या नातेवाईकांकडे चाळीस हजार रुपये मागितलेले नाहीत असे रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी अनुप मालपाणी यांनी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)