मुंबईतील लोअर परळ येथील पीव्हीआरमध्ये छावा चित्रपटाचे स्क्रीनिंग अचानक बंद करण्यात आले. यामुळे छावा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना तीन तास तात्कळत बसावं लागलं. यासंदर्भात माहिती मिळताच ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे पीव्हीआरमध्ये पोहोचले आणि जाब विचारला
सुनील शिंदे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रेक्षकांना पैसे परत करण्याचे आश्वासन पीव्हीआर चालकांनी दिलं आहे. याशिवाय जर प्रेक्षकांना चित्रपट पाहायचा असेल तर ते पुढील आठवड्यात येऊन बघू शकतात असं पीव्हीआर व्यवस्थापनेने सांगितलं आहे
बातमी अपडेट होत आहे…