लाडक्या बहीण योजनेबाबत संजय राऊत यांचा दावा काय? राऊत म्हणाले, आता नवा वाद…

8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 ऐवजी फक्त 500 रुपयेच देण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील अटीनुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही. यामुळे आता नवा वाद निर्माण होऊ शकतो. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावर आता लाडक्या बहिणींनीच प्रश्न विचारले पाहिजेत. ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली, त्या मतांची किंमत आता 500 वर आली आहे, उद्या ती शून्य होईल, असं संजय राऊत म्हणाले.

हे राज्य आर्थिक अराजकाच्या खाईत सापडलंय 

या राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे, कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी कितीही मोठ्या वल्गना केल्या, आव आणला तरी हे राज्य चालवणं हे आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही. त्याचं कारण म्हणजे, गेल्या सा़डेतीन वर्षांमध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपण बिघडलेली आहे, आर्थिक अराजकाच्या खाईत हे राज्य सापडलं आहे. मि. अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांनाही त्या चिंतेंन ग्रासलेलं आहे, अमित शहांकडे एकनाथ शिंदे यांनी तक्रार केली, की अजित पवार आमच्या फाईली मंजूर करत नाहीत, आम्हाला निधि देत नाहीत. आम्हाला निधि देत नाहीत म्हणजे कोणाला? , हा प्रश्न आमच्या सारख्या लोकांना पडतो , तुमचे जे 5-25 आमदार आहेत, गद्दार आहेत ते फक्त निधि आणि पैशांच्या ताकदीवर तुमच्यासोबत राहिले आहेत, या राज्याची तिजोरी लुटण्याची परवानगी त्यांना हवी आहे का ? असा खोचक सवाल राऊत यांनी विचारला.

अमित शहांनी यावर एकनाथ शिंदेंना काय उत्तर दिलं , ते जर लोकांसमोर आलं तर या राज्याचं चित्र स्पष्ट होईल. आम्हाला निधी मिळत नाही हे टुमणं जेव्हा शिंदेंनी लावलं तेव्हा शहांनी दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे. यापूर्वीही त्या दोघांमधला संवाद समोर आलेला आहे, मी आधी सांगितलेला संवाद नाकारलेला नाही असं राऊत म्हणाले. आमचीसुद्धा लोकं आहेत, महत्वाची लोकं आहेत, असं राऊत यांनी नमूद केलं.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)