Sanjay Raut: संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय; तुम्ही अडीच वर्ष तुम्ही काय गोट्या…: संजय शिरसाट

प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनाबाह्य आहेत की नाहीत हे ठरवणारे संजय राऊत कोण आहेत ते काय न्यायाधिश आहेत का, असा सवाल करीत संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याची टीका शिवसेनेचे प्रवक्त्ये आ. संजय शिरसाट यांनी सोमवारी येथे केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शिरसाट बोलत होते. आता आमच्यावर टीका केली जात आहे, पण मग तुम्ही अडीच वर्ष तुम्ही काय गोट्या खेळत होता का? तुम्ही आपल्या पोलीसांवर अविश्वास दाखवून ड्रग्ज माफियांना प्रोत्साहन देत आहेत. राऊत यांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनाबाह्य असल्याचे आठवले. मात्र मुख्यमंत्री घटनाबाह्य आहेत की नाहीत हे ठरवणारे तुम्ही कोण? तुम्ही न्यायाधिश आहात का? यांच्या डोक्यावर परिणाम झालाय असेही शिरसाट म्हणाले.
Rohit Pawar: तयार रहा, दोन दिवसात होणार महाराष्ट्राला हादरवून सोडणारा खुलासा; रोहित पवारांची पोस्ट व्हायरल

देशात लोकशाही आहे. पैशाची सत्ता आली असती तर अंबानी- अदानी पंतप्रधान झाले असते अशा प्रकारच्या कल्पना लढवून, भाषा वापरून टिका करून काही होत नाही. आता सकाळच्या भोंग्यालाच बांबू लावला पाहिजे. तुमचे तुम्ही वाकून पहा. तुम्हाला शरद पवारांनी बांबू घातला. त्यामुळे तुम्हाला किती बांबू लागले ते पहा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुमच्या सल्ल्याची गरज नाही, उलट ठाकरे गटालाच बांबू लागला आहे असेही ते म्हणाले.
कमी मार्क मिळाले म्हणून आई ओरडली; मोठ्या मुलाने जन्मदातीसह १५ वर्षीय लहान भावाची केली हत्या

राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आगीत तेल टाकण्याचे काम नाना पटोले करत आहेत. मी हात जोडून दोन्ही समाजाच्या नेत्यांना विनंती करतो की सरकार आरक्षणाच्या प्रश्नावर गंभीर आहे. दोन समाजात तणाव वाढतोय याची आपण दखल घेतली पाहिजे. अन्यथा राज्य पेटले तर भयंकर प्रकार होईल, असेही शिरसाट म्हणाले.