Sangli Miraj News : सांगलीतील मिरज शासकीय रुग्णालयातून कविता आलदार यांच्या तीन दिवसांच्या बाळाची चोरी झाली होती. पोलिसांनी तत्परतेने तपास करत, सीसीटीव्हीच्या मदतीने सारा साठे नामक महिलेला ताब्यात घेतले आणि बाळ सुरक्षितपणे परत मिळवले. ४८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आई आणि बाळाची भावनिक भेट झाली, ज्यामुळे रुग्णालयात आनंदाचे वातावरण पसरले. पोलिसांनी संशयित महिलेला अटक केली आहे.
मिरज शासकीय रूग्णालयाच्या प्रसुती विभागातून सांगोला येथील कविता समाधान आलदर यांच्या तीन दिवसाच्या बाळाची अज्ञात महिलेने चोरी केल्याची घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. बाळ चोरी करणाऱ्या अज्ञात महिलेचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. कविता आलदार या प्रसुतीसाठी मिरज शासकीय रूग्णालयात दाखल झाल्या होत्या. रूग्णालयात त्यांच्या सोबत आई व वडील होते. संशयित महिलेने आलदर यांचे आई, वडील, इतर नातेवाईकांचा विश्वास संपादन केला.Sangli News : हॅलो! तू चौकात जाऊन थांब ; दागिने बघून चालकाची नियत फिरली, साथीदाराला दिली टीप, पण पोलिसांच्या खबऱ्याने वाट लावली
कविता आलदर यांचे आई, वडील हे जेवायला गेल्यानंतर संशयीत महिलेने कविता अलदर यांच्या बाळाला घेवून बीसीजी लस सोळा नंबरला टोचायचे असे सांगितले. तीन दिवसाच्या मुलाला घेवून महिला तेथून गेली. महात्मा गांधी चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी शासकीय रुग्णालय परिसरात कसून तपास सुरू केला होता. पोलिसांना महिला सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्या महिलेला तासगाव तालुक्यातील सावळज येथून संशयीत महिला सारा सायबा साठे या महिलेस ताब्यात घेतले असून त्याच्याकडून बाळाला ताब्यात घेतले. या महिलेले बाळाची का व कशासाठी चोरी केली याची माहिती गांधी चौकी पोलिस माहिती घेत आहेत.
पोलिसांनी ४८ तासांनंतर बाळाची आणि आईची भेट घडवून आणली. आईची आणि बाळाची भेट झाल्यानंतर हॉस्पिटलमधील सर्वांच्या डोळ्यात आनंदाचे भाव होते. तसेच पोलिसांच्या या तपासाचे सर्वत्त कौतुक होत आहे. पोलिसांनी संशयीत महिलेचा व बाळाचा शोध घेण्यासाठी तपास गतीमान केला होता.