Dental college student Died : क्षितिजकुमार कुंडलिक क्षीरसागर २२ रा अहमदनगर असे मयत तरुणाचे नाव आहे. तो भारती डेंटल महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता. रंगपंचमी निमित्त डेंटल महाविद्यालयाचे पाच ते सहा तरुण याठिकाणी असणाऱ्या फार्म हाऊसवर रंगपंचमी खेळण्यासाठी आले होते. याठिकाणी रंगपंचमी खेळून झाल्यानंतर दुपारी ३ वाजता ते शेततळ्यात पोहायला गेले होते.
क्षितिजकुमार कुंडलिक क्षीरसागर २२ रा अहमदनगर असे मयत तरुणाचे नाव आहे. तो भारती डेंटल महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता. रंगपंचमी निमित्त डेंटल महाविद्यालयाचे पाच ते सहा तरुण याठिकाणी असणाऱ्या फार्म हाऊसवर रंगपंचमी खेळण्यासाठी आले होते. याठिकाणी रंगपंचमी खेळून झाल्यानंतर दुपारी ३ वाजता ते शेततळ्यात पोहायला गेले होते. मात्र पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
यावेळी सोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित सिंद हे घटनास्थळी पोहोचले. तसेच सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने सदरचा मृतदेह पाण्यातून काढून मिरज शासकीय रुग्णालयात महादेव ऍम्ब्युलन्स यांच्या माध्यमातून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सदर घटनेची माहिती मिळताच भारती डेंटल महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी घटनास्थळी जमा झाले होते. रंगपंचमी साजरी केली जात असताना ही घटना घडल्याने मित्रांना धक्का बसला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत होळीच्या सणानंतर धुळवड आणि रंगपंचमीच्या सणांचा बेरंग झाला. मित्रांसोबत रंगपंचमीचा उत्सव साजरा करण्यासाठी नदी किंवा तलावाकाठी गेलेल्यांपैकी अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या बऱ्याच घटना विविध जिल्ह्यांत घडल्याचे पहायला मिळाले. अनोळखी जागांवर जाऊन तारुण्याच्या उत्साहात तरुणांकडून बऱ्याच अशा चुका घडतात ज्यांमुळे त्यांना त्यांच्या प्राणाला मुकावे लागते. कुटुंबाचा किंवा घरी वाट पहात असलेल्या आपल्या आई-वडिलांचा विचार न करता अतिउत्साहात मुलं अशा गोष्टी करतात ज्यात त्यांचा जीवही जातो. आणि हाता-तोंडाशी आलेला घास आई-वडीलांकडून हिरावला जातो. त्यामुळे तरुणाईने असे कोणतेही जोखमीचे पाऊल उचलताना एकवेळ आपल्या आई-वडीलांचा विचार जरुर करावा अशा सामान्य जनतेच्या भावना आहेत