Sangli News: भाड्याने राहायला जाण्यावरुन सतत वाद, तो संतापला अन् सुखी संसाराची माती, सांगली हादरली

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: एका व्यक्तीने आपल्या पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. भाड्याने राहायला जाण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून या नवऱ्याने बायकोच्या डोक्यात खोरे मारून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सलमा गुराप्पा इकुरोट्टी (वय २८, रा. खानापूर नाका, विटा, ता.खानापूर) असे या दुर्दैवी महिलेचं नाव आहे. या निर्घृण हत्येप्रकरणी पती गुराप्पा शंकराप्पा इकुरोट्टी (वय ३०, सध्या राहणार खानापूर नाका, विटा ता. खानापूर, मूळ रा. याडहळ्ळी ता. शोरपुराजि, जि. यादगीर राज्य कर्नाटक) याला विटा पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली.

किरकोळ कारणांवरुन सतत पती-पत्नीत वाद

याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खानापूर नाक्याजवळ विजय उथळे यांच्या मालकीच्या खोलीत मूळचे कर्नाटक राज्यातील यादगिरी जिल्ह्यातील गुराप्पा इकुरोट्टी आणि त्याची पत्नी सलमा इकुरोट्टी हे दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून भाड्याने रहात होते. मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्यात वारंवार किरकोळ कारणावरून वाद होत होता.
Hathras Stampede: खोलीत फक्त तरुणींना प्रवेश, हाथरस सत्संग दुर्घटनेनंतर भोले बाबाचं गुपित उघड

लोखंडी खोऱ्याने पत्नीच्या डोक्यात वार

बुधवारी ३ जुलै रोजी रात्री आठ वाजल्यापासून त्यांच्यात भाड्याची खोली बदलून कोठे राहायला जायचे, या कारणावरून जोरदार वादावादी सुरू होती. या भांडणातून रागाच्या भरात संशयित गुराप्पा इकुरोट्टी याने घरात असणाऱ्या लोखंडी खोऱ्याने पत्नी सलमाच्या डोक्यात वार केला. त्यात डोक्याला जबर जखम झाली आणि तिचं खूप रक्त वाहून जागीच सलमाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

या खुनाच्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्ष शरद मेमाणे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याबाबत विटा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल महेश अरूण संकपाळ यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन करीत आहेत.