Unseasonal Rain in Sangli : सांगलीत अवकाळी पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील अनेक शहरांना पावसाने झोडपून काढलं आहे. अवकाळीमुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
अवकाळीमुळे रब्बी पिकांना फटका
तासगांव तालुक्यातील आळतेला मंगळवारी गारपीटीसह उन्हाळी पावसाने झोडपले. या पावसाचा द्राक्ष, बेदाणा, गहू, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. शेतातील काढलेली पिके गोळा करण्यासाठी आणि बेदाणा शेडवर कागद घालण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ दिसून आली. तासगाव तालुक्यातील आळते गावाला दुपारी अडीच वाजता वादळी पाऊस आणि गारपीटीने झोडपले. तसेच तालुक्यातील चिंचणी, लोढे, कौलगे, बस्तवडे, वाघापूर यांसह अन्य गावांमध्ये तुरळक पावसाने हजेरी लावली.Ratnagiri News : कोकणात अवकाळी पाऊस, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आंबा, काजू बागायतदार चिंतेत
सध्या रब्बीच्या गहू, हरभरा या पिकांचा काढण्याचा हंगाम असून द्राक्ष आणि बेदाणा यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या द्राक्षाचं नुकसान होणार असून खरड छाटणी होऊन फुटलेल्या काड्यांना जर मार लागला तर पुढील हंगामात त्याला द्राक्ष येत नाहीत असा इतिहास आहे. तसेच पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळे बेदाणा शेडवरील बेदाणा काळा पडणार पडण्याची भीती असल्याने शेतकरी धास्तावला आहे. अनेक तालुक्यात सध्या अद्यापही १५ ते २० टक्के द्राक्ष बागातील द्राक्षे विक्रीसाठी जायची बाकी आहेत. तर काही शेतकऱ्यांनी द्राक्षे बेदाण्यासाठी रॅकवर टाकली आहेत. मंगळवारच्या या पावसामुळे द्राक्षांना क्रॅकिंग येण्याची तसेच द्राक्षातील साखर कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता होत आहे.Vehicle Rule News : व्यावसायिक वाहनांवरील संदेश आता मराठीतच, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारचा मोठा निर्णय; RTO ला सूचना
वादळी वाऱ्याने घराचे पत्रे उडाले, रस्त्यावर पाणी साचले
गेले दोन दिवस सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांना पावसाचा इशारा दिला आहे. सोमवारी जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस झाला. मात्र मंगळवारी सकाळपासून उन्हाचा पारा वाढला होता. त्यानंतर संध्याकाळपासून शहरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. मिरज शहरातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. तर काही ठिकाणी अनेकांच्या घरांची पत्रे उडून लांब वर पडली होती. काहींनी घराच्या छतावर लावलेले सोलर पॅनल दूरवर पडले होते. मिरजेतील सकल भागामध्ये पावसाचं पाणी साचून सर्वत्र पाणी तुंबले होते. तुंबलेल्या पाण्यामुळे महापालिकेच्या कारभाराचा या पावसाने पोलखोल केली आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहताना दिसत होते.Thane News : ठाण्यात उन्हाच्या झळांपासून रक्षण करण्यासाठी सिग्नलवर कापडी जाळीचे आच्छादन, महानगरपालिकेचा उपक्रम
वादळी वाऱ्याने विजेचे खांब वाकले, वीजपुरवठा खंडित
वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत. तर काही झाडे विजेच्या तारांवर पडल्याने वीज वितरण विभागाने काही काळ वीज पुरवठा खंडीत केला होता. वीज वितरण विभागाचे कर्मचारी अनेक ठिकाणी फिरुन कुठे – कुठे वीजेची तारा तुटल्या आहेत, त्या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित करुन परत विजेच्या तारा जोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु होते. रात्री बराचवेळ मिरज शहरात लाईट नव्हती.
Sangli News : सांगली जिल्ह्याला अवकाळीने झोडपले; वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, रब्बीला पिकाला फटका
शहरातील शास्त्री चौक, गाढवे चौक, गांधी चौक, नदीवेस, मंगळवार पेठ, वखारभाग, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड आदी सखल भागात पावसामुळे सर्वत्र चिखल झाला होता. गांधी चौकामध्ये भलेमोठे झाड दुकानावर पडले. यात दुकानाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कुठेही जीवतहानी झाली नाही. इसापुरे गल्ली येथील जनावरांच्या गोठ्याचा पत्रा वाऱ्याने उडून रस्त्यावर येऊन पडला. पत्रा रस्त्यावरच पडल्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. वाऱ्याची तीव्रता इतकी होती की जनावरांच्या गोठयांचे चारही खांब उखडून वाऱ्याने उडाले.