Sambhaji Bhinde Guruji on Waghya Samadhi – रायगडावरील वाघ्याकुत्र्याची स्मारक हटवण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती करत असताना संभाजी भिडे गुरुजींनी संभांजीराजेंना चूकीचे ठरवत वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला समर्थन दिले आहे.
काय म्हणाले भिडे गुरूजी?
संभाजी भिडे गुरूजींनी वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासंबंधी भूमिका घेत म्हटले की, संभाजीराजे भोसले बोलतात ते १०० टक्के चुक आहे. वाघ्या कुत्र्या बाबत मी वाचलं आहे आणि ती कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे. माणसं एकनिष्ठ नसतात,तेवढी कुत्री असतात, निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचे आहे,याचे द्योतक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथंच पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभावी होते का या प्रश्नावर उत्तर देताना भिडे गुरूजी म्हणाले की, ते नव्हते, आम्ही चिकटवलंय, छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते.शहाजीराजे असे बोलले होते की, मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं आहे. स्वतंत्र राज्य निर्माण करायचं आहे. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघल, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज,सिद्धी हाप्शी, या सर्व परकीय आक्रमकांनी सगळा देश खाऊन टाकलायं. हिंदूची संस्कृती रक्षणासाठी मला हिंदूंची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे. याचे पुस्तकात पुरावे आहेत. आत्ताचे व्याख्याते आपल्या वक्तव्यातून महाराजांचा उपयोग आपल्या आपल्या सोयीसाठी वापरतात.
संभांजीराजेंच मुख्यमंत्र्यांना पत्रमाजी खासदार संभाजीराजे यांनी वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन दिवसांपूर्वीच पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी कथित वाघ्या कुत्र्याची समाधीची संरचना काही दशकांपूर्वी उभारली आहे. वाघ्या नामक कुत्र्याचा शिवकालीन इतिहासात उल्लेख नाही अथवा संदर्भ नाही.पुरातत्व खात्यानेही याबद्दल ऐतिहासिक माहिती पुरावे नसल्याची स्पष्टोक्ती दिली आहे असे म्हटले आहे. अशी कलपोकल्पित समाधी उभारण्यात आली आहे हे महाराष्ट्राच दुर्देव आहे. ३१ मे पर्यंत हे अतिक्रमण हटवण्यात यावे अशी मागणी केली आहे.