Sajany Raut On BJP : कौन राहुल? ये है राहुल! ये तो ट्रेलर है. आगे आगे देखो… संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

मुंबई : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक पार पडली असून एनडीएने सरकार केंद्रात सरकार स्थापन केलं आहे. निवणुकीनंतरच्या पहिल्या संसदीय अधिवेशनाला सुरवात झाली आहे. आज (26 जून) रोजी लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची तर लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची निवड करण्यात आली आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर सभागृहतील एक फोटो शेअर करत भाजपवर निशाणा साधला आहे.

संजय राऊतांची पोस्ट काय ?

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांना पदभार स्वीकारण्यासाठी हंगामी अध्यक्षांनी आमंत्रित केले होते. याप्रसंगी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही उपस्थित होते. तोच फोटो शेअर करत पुढे लिहिले की, ”हा हा हा..कौन राहुल? ये है राहुल! ये तो ट्रेलर है. आगे आगे देखो होता है क्या?” असं म्हणत भाजपला टोला लगावला आहे. तसेच भाजपच्या अधिकृत अकाऊंटला टॅग देखील केले आहे.
राहुल गांधी ग्यानबा तुकारामांचा गजर करणार, आषाढी वारीच्या दौऱ्याचे नियोजन, काँग्रेसच्या बड्या नेत्याची माहिती

संजय राऊतांनी असं ट्विट का केलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या होत्या. तेव्हा एका मुलाखतीमध्ये पत्रकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी यांच्याविषयी प्रश्न विचारला होता. त्यावेळी कौन राहुल? असं उत्तर मोदींनी दिले होते. तसेच हा व्हिडिओ निवडणुकीच्या काळात प्रचंड व्हायरल झाला होता.

खासदार निलंबनावरून ओम बिर्लांवर टीका

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, ”आम्ही आंदोलन केले नाही, निवडणूक होऊ नये ही परंपरा आहे, आम्ही तुमच्यासमोर उभे राहू आणि आम्ही आहोत हेही दाखवून दिले. ओम बिर्ला यांनी एका झटक्यात 100 हून अधिक खासदारांना निलंबित केले होते, आणीबाणीच्या काळात असे झाले नाही.”