Vaishnavi Hagavane Death case : राजेंद्र हगवणे यांच्या अटकेनंतर रुपाली चाकणकर यांचं ट्विट चर्चेत

रुपाली चाकणकर यांचं ट्विट चर्चेतImage Credit source: social media

पुण्यातील मुळशी येथील एका गावातील विवाहीत महिला वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण राज्यात खळबळ माजली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पती, सासू, नणंद, सासरे यांच्या छळामुळे कंटाळून अवघ्या 23 वर्षांच्या वैष्णवीने 9 महिन्यांच्या लगहान मुलाला मागे सोडत आत्महत्या केली. याप्रकरणी तिचा पती शशांक, सासू लता आणि नणंद यांना अटक करण्यात आली होती. पण सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हे गेले 7 दिवस फरार होते. अखेर आज पहाचटेच्या सुमारा पिंपरी पोलिसांन कारवाई करत त्या दोघांना अटक केली असून त्यांना आता बावधन पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे.

वैष्णवीचा पती शशांक हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पदाधिकारी होता, मात्र कालच त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. वैष्णवीच्या सासरच्या लोकांचे राजकीय नेत्यांशी लागेबांधे असल्याने हे प्रकरण दडपण्यात येईल, ते असेच सुटतील अशी भीत माहेरच्या लोकांकडून आणि राज्यातील नागरिकांकडून व्यक्त होत होती. मात्र कोणालाही सोडणार नाही, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यापासून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत सर्वांनी दिले.

वैष्णवीचे सासरे आणि दीर यांच्या आजच्या अटकेनंतर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट केलं असून ते चर्चेत आलं आहे. ‘ वैष्णवी हगवणे प्रकरणातील दोन्ही फरार आरोपी आज पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेत पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आला होता. कायदा,सुव्यवस्था व प्रशासन त्यांचे काम उत्तमरित्या करत आहे.गुन्हा नोंद आहे,आरोपींवर कडक कारवाई होईल यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करत आहे.’ असं चाकणकर यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

रुपाली चाकणकर यांचं ट्विट

दरम्यान आज दुपारी रुपाली चाकणकर या वैष्णवीच्या आई-वडिलांची, कस्पटे कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी पत्रकार परिषद घेऊन चाकणकर या त्यांची भूमिका मांडणार असल्याचे समजते. तसेच त्या पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक यांचीही भेट घेणर आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)