Risky Reels : बहुमजली इमारतीवरून तरुणीचा रिस्की रिल्स, जीव धोक्यात घालून केला स्टंट, आले कंठाशी प्राण

Reel Making Video, पुणे : रिल जेवढा युनिक तेवढं त्याला रिच जास्त असं सूत्र आता तरुणाईला माहिती झाले आहे. पण या युनिकनेसच्या नादात आपला जीव जाऊ शकतो याची सूतरामही कल्पना सध्याच्या तरुणाईला नाही आहे.नुकताच असा एक प्रकार पुण्यात घडला. पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळील एका पडीक इमारतीच्या छताला लटकून जीव धोक्यात घालून एका मुलीने रील बनवले, त्यावरून सोशल मीडियावर जोरदार टीकेची झोड उठवली जात आहे. व्हिडिओमध्ये मुलगी छताला लटकलेली असून तिने एका मुलाचा हात पकडला आहे. हा व्हिडिओ एका वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूला शूट करण्यात आला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये

या व्हिडिओमध्ये एका जोडप्याचा धोकादायक स्टंट दाखवण्यात आला आहे. मुलगा छतावरून खाली बघत उभा आहे तर त्याचा मित्र कॅमेऱ्यात दृश्य कैद करत आहे. मुलगी कोणत्याही अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेशिवाय लटकलेली दिसत आहे, फक्त तिच्या जोडीदाराचा हात धरून आहे. व्हिडिओमध्ये, मुलगी इमारतीच्या पलीकडे उतरताना आणि जवळजवळ हवेत लटकताना दिसत आहे. स्टंट करताना मुलगी हसतानाही दिसत आहे.

रिल्ससाठी ‘बेफिकरे’

ही बेफिकर जोडी शॉर्टफिल्मचे शूटिंग करत होती की सोशल मीडिया रील हे स्पष्ट झाले नाही. धोकादायक स्टंटसाठी आवश्यक सुरक्षा उपायांचा अभाव व्हिडिओमध्ये जाणवत होता. हा व्हिडीओ इंटरनेटवर येताच त्यावर जोरदार टीका झाली. “ सध्याच्या काळात किशोरवयीन मुलांच्या हातात मोबाईल आल्याने फेमस होण्यासाठी देव जाणे ते कोणत्या थराला जाऊ शकतात, हे अजून आपल्याला पाहायचे शिल्लक आहे का? ,” असे सोशल मीडिया वापरकर्त्यांनी म्हटले आहे.
Nitish Kumar PM Modi : दोघं स्टेजवर, अचानक नितीश कुमारांनी पंतप्रधान मोदींचा हात हातात घेतला; नेमकं काय घडलं? Video ची चर्चा

सोशल मीडियावर टीका

युजर्सने या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला, कारण निष्काळजीपणामुळे मुलीचा जीव गंभीरपणे धोक्यात येऊ शकतो. या व्हिडिओने सोशल मीडियावर पटकन लक्ष वेधले, परंतु टीकाही तितकीच तीव्र होती. स्टंट करताना मुलगी आणि तिच्या सहकाऱ्यांनी अवलंबलेली धोकादायक कृती ही जीवाचा थरकाप उडवून देणारी आहे.

या फुटेजमध्ये मुलीला फक्त तिच्या जोडीदाराच्या हाताने कसा आधार दिला गेला आणि इतर सुरक्षेचे उपाय कसे नव्हते हे दाखवले आहे. स्टंट करताना आनंदी असूनही, एक छोटीशी चूक घातक ठरू शकते हे स्पष्ट होते. व्हिडिओच्या व्यापक टीकेमुळे तरुण लोक अशा धोकादायक कृत्यांमध्ये का गुंततात, विशेषत: जेव्हा आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन केले जात नाही तेव्हा प्रश्न पुन्हा निर्माण झाले आहेत.