Republic Day : 2015 ते 2025… दहा वर्ष, विविध फेटे अन्… पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या लूकचं वैशिष्ट्यं काय?

आपला देश यंदा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आजच्याच दिवशी 1950 साली भारतीय राज्यघटना लागू झाली आणि भारत एक लोकशाही देश नावारूपाला आला. 1950 साली आजच्याच दिवशी डॉ. राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती झाले होते. 26 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील एक खास दिवस आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. राजधानी दिल्लीत हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर ध्वजारोहण केले जाते, परेड काढण्यात येते, विविध राज्यांचे देखावे असतात आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही होतात.

परेडदरम्यान लष्करी दल त्यांच्या शक्तीचे प्रदर्शन करताना दिसतात. तसेच विविध प्रकारचे साहस दाखवतात आणि विविध राज्यांच्या संस्कृतीची झलक देखील पाहायला मिळते. प्रजासत्ताक दिनाची परेड सुरू होण्यापूर्वी भारताचे पंतप्रधान राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देतात आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतात.

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या रंगाची पगडी म्हणजे फेटा परिधान करताना दिसतात. हे फेटे देशाच्या विविध भागांची संस्कृती असून 2015 ते 2024 या काळात पंतप्रधान मोदींनी विविध प्रकारचे फेटे परिधान केले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी कधी गुजरात, कधी महाराष्ट्र तर कधी उत्तराखंडची टोपी परिधान करताना दिसले.

यंदाही पंतप्रधान मोदींचा प्रजासत्ताक दिनानिमित्त लूक एकदम खास होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी लाल व पिवळ्या रंगाचा फेटा परिधान केला .  या फेट्यातून यंदा राजस्थानी पगडीचा मान ठेवत संस्कृती दर्शवली. पांढरा कुर्ता-पायजमा आणि तपकिरी रंगाचे जॅकेट परिधान केले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लूक रुबाबदार दिसत होता.

2021 मध्ये पंतप्रधानांनी लाल रंगाचा हलारी फेटा परिधान केला होता. याआधी पंतप्रधान मोदी बंदेज प्रिंटचा भगवा फेटा परिधान करताना दिसले होते. तसेच गेल्या काही वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी देशातील विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतरही अनेक सुंदर फेटे परिधान करून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात दिसले होते.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)