Relationship Tips : तमन्ना सारखे तुम्ही पण फसले एकतर्फी प्रेमात? हे संकेत तुम्ही ओळखले नाहीत का?

एकतर्फी प्रेमाचा खेळImage Credit source: गुगल

हॉट आणि टँलेंटेड तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्यात वनवे सुरू असल्याच्या वार्ता समोर येत आहे. अर्थात या अफवा आहेत की दुसरं काही हे समोर येईलच. पण तुम्ही सुद्धा एखाद्या नात्यात असाल, रिलेशनशीपमध्ये असाल आणि तुम्हाला हे प्रेम एकतर्फीच वाटत असेल तर हे संकेत अगोदर समजून घ्या. हे संकेत तुम्हाला प्रेम दोन्ही बाजूंनी आहे की एका, ते सांगतील. सध्या पुन्हा ब्रेकअपचा ‘मौसम’ सक्रिय झाल्याचे समोर येत आहे. तेव्हा या वातावरणात तुम्ही कोणता निर्णय घ्यावा हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. पण तुमचा जोडीदार तुमचाच आहे? हे संकेत तर तोपर्यंत समजून घ्या…

सुरुवात कोण करतं बरं?

म्हणजे दिवसभरात कोण कॉल, मॅसेजमधून आठवण काढतं. अथवा फोन लावल्यावर कोण अगोदर बोलतं? नात्यातील प्राथमिकताच ही संवाद आहे. जर संवाद करण्यासच तुमचा जोडीदार उत्सुक नसेल तर मग त्याच्याशी एकदा चांगलं मनमोकळं करून बोला. त्याचा मोकळेपणा एकदा तपासूनच पाहा. त्याला बडबड करण्याची सवय वा सवड नसेल तर निदान दिवसभरात तुम्ही त्याच्या जगात आहात की नाही, याची तर त्याला तसदी घ्यायला लावा, नाही का? तसं नसेल तर मग अजून काय मोकळेपणानं सांगायचं राव?

वेळ आहे कुणा पाशी?

नात्यात राव ही वेळ फार राडा घालते बरं. जर तुमचा साथीदार, जोडीदार सतत कोणत्या ना कोणत्या कामात असेल आणि त्यातून सवड काढून तो तुमची साधी आठवण काढत नसेल तर मग त्याला म्हणा बाबा रे खड्ड्यात जा. त्याला जर तुमच्या सोबत टाईम खोटी करायला आवडत नसेल ना, तर म्हण चल फूट. असा तू कोण लागून गेला रे! अर्थात तुमच्यात तेवढी हिंमत पण पाहिजे काय?

तू आहेस की नाहीस?

भेंडी, ही मिजास आपल्याला काही आवडत नाही. म्हणजे प्रेम तर केलं. पण वेळ ही देत नाही आणि फुगीरपणा ही सोडत नाही. तुम्ही त्याच्या जवळ, तिच्या जवळ सारखा पिंगा घालता आणि हे प्रकरण भलत्याच दुनियेत असतं. त्याला तुमच्या असण्याचा आणि नसण्याचा काहीच फरक नाही म्हटलं, त्याला म्हणाव, तिला म्हणावं बाबा, बस्स आता. तू तुझ्या दुनियेत सुखी राहा. मी माझ्या घरी सुखानं जगतो. कशाला अशा नात्याची जळमळटं घेऊन जगायचं बाबा.

म्हणजे, भाई काही किंमतच नाही आपल्याला

आहे एक किडा तुमच्या पार्टनरमध्ये असेल ना, तर एका दमात त्याला जय महाराष्ट्र करा. तो तुमच्याशी त्याचा आनंद, त्याचे दुःख, त्याचा भावनाच शेअर करत नाही म्हटल्यावर त्या मुर्दाडाला त्याच्याच वाळवंटात सोडून या की. तो तुम्हाला काडीची किंमत देत नाही ना? तरी त्याला एकदा त्याचा लोचा विचारून घ्या. पण जर तो सारखं चेकमेट करत असेल ना, तर म्हणा, बाबा तू लै मोठा सायंटिस्ट वगैरे हो, पण आपल्या प्रेमाच्या भानगडीत पडू नकोस. अशा एकतर्फी प्रेमात तुम्हाला एकट्यालाच एकटेपणाच आनंद घ्यायचा असेल तर तो तुमचा प्रश्न आहे, काय समजलं?

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)