रेड सिग्नलला सुद्धा गाडीचे इंजिन चालू ठेवता? ‘हे’ नुकसान एकदा वाचा त्यानंतर ताबोडतोब कराल गाडी बंद

वाढत्या प्रदूषणाने पर्यावरणावर ताण पडू लागला आहे. त्याचबरोबर अनेक कंपन्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहन देखील भारतीय बाजारपेठेत लाँच केलेली आहे. त्याचबरोबर सरकार प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी ‘रेड लाईट ऑन-कार ऑफ’ आणि ‘ऑड-इव्हन’ सारख्या मोहिमाही चालवत आहे. सरकारची ही मोहीम तुमचा पाठिंबा मिळाला तरच यशस्वी होईल, पण तरीही लोकं रेड सिग्नलवर त्यांच्या कार, बाईक आणि स्कूटरचे इंजिन बंद करत नाहीत. लोकांच्या या छोट्या चुकीमुळे इंजिन चालू राहते आणि यामुळे प्रदूषण तर वाढतेच पण इतर अनेक प्रकारचे नुकसान देखील होते ज्याचा परिणाम खिशावरही होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात रेड सिग्नलवर गाड्या चालू ठेवल्याने कोणते वाईट परिणाम तुमच्या गादीवर आणि खिश्यावर होतो.

रेड सिग्नलवर इंजिन चालू ठेवण्याचे परिणाम

रेड सिग्नल लागताच काही लोकं त्यांची गाडी गियरमध्ये टाकून सिग्नल ग्रीन होईपर्यंत थांबवून ठेवतात, ज्यामुळे त्यांना क्लच दाबून ठेवावा लागतो. कारण क्लच गिअरमधून सुटताच गाडी जागेवरच थांबते. त्यामुळे विनाकारण क्लच सतत दाबून ठेवल्याने क्लच प्लेटवरही वाईट परिणाम होतो, ज्यामुळे क्लच प्लेट खराब होण्याची शक्यता वाढते.

तसेच क्लच सतत दाबून ठेवल्याने इंधनाचा अपव्यय किंवा क्लच प्लेट निकामी होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या खिश्यावर मोठी कात्री बसू शकते, एवढेच नाही तर इंधनाचा वापर वाढल्याने मायलेजवरही परिणाम होऊ शकतो. ट्रॅफिक लाईनमध्ये इंजिन चालू ठेवण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमचे वाहन इंधन जळत राहते, ज्यामुळे इंधनाचा संपूर्ण अपव्यय होतो. दुसरा तोटा म्हणजे इंजिन चालू असेल तर वाहनातून निघणाऱ्या धुरातील घातक वायू प्रदूषणात वाढ करतात.

रेड सिग्नलला इंजिन बंद करण्याचा फायदा?

जेव्हा रेड सिग्नल असेल तेव्हा इंजिन बंद करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इंधनाची म्हणजेच पैशाची बचत होईल. केवळ पैशांची बचत करूनच नाही तर या छोट्याशा गोष्टींद्वारे तुम्ही पर्यावरण सुरक्षित ठेवण्यातही हातभार लावू शकता.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)