केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात आता एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. रक्षा खडसे आणि आरोपी पीयूष मोरे यांची ही ऑडिओ क्लिप आहे. यात रक्षा खडसे या आरोपीवर चांगल्याच संतापलेल्या असल्याचं ऐकायला मिळत आहे. मात्र टीव्ही9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
मुक्ताईनगरच्या यात्रेत काही मुलींसोबत मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी गेलेली असताना तिची छेड काढल्याचा प्रकार घडला होता. विशेष म्हणजे सोबत असलेल्या सुरक्षा रक्षकाला देखील यावेळी दादागिरी करण्यात आलेली होती. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकूण सहा आरोपींवर पोक्सो अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे.